Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई

एका कृमीवर हे संशोधन (Reasearch On Worms) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. दूध बनवण्याच्या प्रक्रियेत आणि मुलांना दूध पाजण्याच्या प्रक्रियेत आई कमकुवत होते

Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई
हे कीटक त्यांच्या शरीरातील पोषक द्रव्यं त्यांच्या मुलांना हस्तांतरित करतात. हेच पोषक घटक या कीटकांना जिवंत ठेवत असतात.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 07, 2021 | 12:27 PM

आईच्या प्रेमाबद्दल बोलावं तितकं कमी आहे, आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. मग तो माणूस असो वा प्राणी. आई ही सर्वांमध्ये समान असते. तिच्या बाळासाठी झटणारी, झगडणारी, त्याला हवं ते पुरवणारी आणि प्रसंगी आपले प्राणही देऊन त्याला नवजीवन देणारी. अशाच एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Reasearch On Worms) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. दूध बनवण्याच्या प्रक्रियेत आणि मुलांना दूध पाजण्याच्या प्रक्रियेत आई कमकुवत होते (Mother Worm Dies Feeding Milk To Young Ones) आणि शेवटी मारते. ( A mother who dies after giving milk to her baby. Research on Nematod Worm at the University of London )

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (University College London) मते, ही प्रक्रिया नेमाटॉड कृमीमध्ये (Nematod Worm) सापडते. ही मादी अळी निस्वार्थपणे आपल्या मुलासाठी दूध बनवते आणि नंतर मरते.आता या संशोधनाद्वारे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो की, माणसांमधील वृद्धत्व कसं थांबवता येईल? या संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर डेव्हिड जेम्स यांच्या मते, जर हे संशोधन यशस्वी झाले तर माणसांचं वृद्धत्व थांबवता येऊ शकतं.

ही कृमी कशाप्रकारे मरते?

आतापर्यंत संशोधनात असे समोर आले आहे की, हा कीटक शरीरात एक विशेष प्रकारचे द्रव तयार करतात. हा द्रव पिवळ्या रंगाचा आहे. जो मादी अळीच्या आत तयार होतो. हा द्रव पदार्थ अम्लीय घटकांनी बनलेला आहे, जो आतल्या आत किटकांचं शरीर खातो. यामुळे मादीचे शरीर सडण्यास सुरुवात होते आणि काही वेळातच तिचा मृत्यू होतो. याशिवाय, हे कीटक स्वतःच्या वजनापेक्षा जास्त अंडी घालतात हेही त्यामागंचं एक कारण आहे.

मृत्यूचं कारण नक्की काय?

संशोधक म्हणतात की, हे कीटक त्यांच्या शरीरातील पोषक द्रव्यं त्यांच्या मुलांना हस्तांतरित करतात. हेच पोषक घटक या कीटकांना जिवंत ठेवत असतात. पण एक मादी तिच्या बाळाला जिवंत ठेवण्यासाठी हे हस्तांतरित करते. यामुळे, अंड्यातून बाहेर आल्यानंतर मूल मजबूत होते, परंतु आईचा मृत्यू होतो. संशोधक आता या पद्धतीमागील प्रक्रिया जाणून घेण्यात मग्न आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की जर ही प्रक्रिया पकडली गेली, तर वय कमी करण्याची प्रक्रिया मानवी शरीरात होऊ शकते, ज्यामुळे माणसांचं आयुष्य वाढेल.

हेही वाचा:

भूतांच्या अफवांनी आलिशान महालाची वाट, ब्रिटनमधला या महालाजवळ जाण्याची आजही कुणाची हिंमत नाही

इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी चाचणीवरून वाद का?, खासदारांकडून चाचणीवर बंदीची मागणी का?, जाणून घ्या सविस्तर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें