मुंबईत शनिवारी फक्त महिलांसाठी लस, विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शनिवार, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत फक्त महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबईत शनिवारी फक्त महिलांसाठी लस,  विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार
VACCINATION
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 12:00 AM

मुंबई : कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवणे गरजेचे आहे. याच कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका वेगवगेळ्या मोहिमा राबवत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या (दिनांक 9 ऑक्टोबर) सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत फक्त महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

ऑनालाईन पूर्वनोंदणी बंद, शनिवारी फक्त महिलांना लस

मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये तसेच कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. ह्यात कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रादेखील घेता येणार आहे. फक्त महिलांसाठी राखीव विशेष सत्र असल्यामुळे उद्यासाठीची ऑनलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा 

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे. या राखीव सत्राचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

दिवसभरात 532 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

दरम्यान, मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. तसेच मुंबईत नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचेदेखील पालन करत आहेत. याच कारणामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. मुंबईत आज दिवसभरात 532 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात 287 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 723108 वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत 5017 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 1123 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे

इतर बातम्या :

ऊसाची FRP एकरकमीच मिळणार, पिषुय गोयल यांचं सदाभाऊ खोतांना आश्वासन

मार्डच्या लढ्याला यश, कोरोनाकाळातील रुग्णसेवेची दखल, प्रत्येक निवासी डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये, आदेश जारी

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

(vaccination in mumbai will only for women on saturday)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.