IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला रोमहर्षक सामन्यात आरसीबीने मात दिली आहे. 7 विकेट्सनी आरसीबीचा संघ विजयी झाला आहे.

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय
ग्लेन मॅक्सवेल

IPL 2021: आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवले. अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा फलंदाज केएस भरत(K S Bharat) याने संघाला अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार ठोकत विजय मिळवून दिला.

आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने आजची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक होती. पण दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने लढत चुरशीची झाली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 164 धावा केल्या. ज्या करण्यासाठी आरसीबीलाही संपूर्ण 20 ओव्हर्सची गरज लागली. पण अखेर लक्ष्य पूर्ण करत आरसीबीने विजय मिळवला.

दिल्लीची दमदार सलामी

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. त्यामुळे फलंदाजी दिल्लीकडे गेली. ज्याचा दिल्लीच्या सलामीवीरांनी संपूर्ण फायदा उचलला. दिल्लीची हीट जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर शिखरने 43 आणि पृथ्वीने 48 धावा केल्या. ज्यामुळे दिल्लीला एक चांगली सुरुवात मिळाली. ज्यानंतर शिमरॉन हीटमायरच्या 29 धावांच्या जोरावर दिल्लीने 164 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून सिराजने 2 आणि चहल, पटेलसह ख्रिस्टीयनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भरत-मॅक्सवेल जोडीची भागिदारी आणि आरसीबी विजयी

विजयासाठी 165 धावा करण्याकरता मैदानात आलेल्या आरसीबीचे सलामीवीर विराट आणि देवदत्त लगेच बाद झाले. एबीही 29 धावा करुन तंबूत परतला. पण त्यानंतर मैदानात आलेल्या केएस भरत आणि ग्ले मॅक्सवेल जोडीने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत देत संघाला विजय मिळवून दिला. भरतने नाबाद 78 आणि मॅक्सेवेलने नाबाद 51 धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना आरसीबीच्या केेएस भरत याने षटकार ठोकत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे

रोहित शर्मा, विराट कोहलीपेक्षा अधिक क्रिकेटिंग शॉट्स ‘या’ भारतीय खेळाडूकडे, माजी सलामीवीर गौतम गंभीरचं मत

T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात

(In RCB vs DC match Royal challengers Banglore won match with 7 wickets agaisnt Delhi capitals KS Bharat Hit last bowl six)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI