AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे

सध्या एकाच वेळी आयपीएलचे दोन सामने खेळवले जात आहेत. एकीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ भिडणार आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघामध्ये सामना सुरु आहे.

MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे
इशान किशन
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 8:29 PM
Share

IPL 2021: मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद (MI vs SRH) या संघात सुरु असलेल्या सामन्यात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई शर्थीचे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना सलामीवीर इशानच्या मेहनतीची जोड मिळाली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईला जबरदस्त सुरुवात करु दिली आहे. इशानने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.

मुंबई इंडियन्ससाठीआजचा मोठा दिवस आहे. कारण, आजच्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैद्राबादला नमवणं केवळ लक्ष्य नसून एका मोठ्या फरकाने मात देणे गरजेचे आहे. सर्वात आधी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणं महत्त्वाचं होतं ते मुंबईने केलं आहे. आता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम करत जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. धावांचं शिखर कसं बनवता येईल हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर सनरायजर्स हैद्राबादला कमीत कमी 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागेल तेव्हाच ते केकेआऱला नेट रनरेटच्या शर्यतीत मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील. दरम्यान या दिशेने प्रयत्न करताना इशानने सुरुवात तर उत्तम करुन दिली आहे. त्याने अर्धशतक तर ठोकलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील मुंबईत्या खेळाडूकडून ठोकण्यात आलेलं हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी पोलार्डच्या नावावर 17 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड होता.

IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतकं

इशान किशन विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (16 चेंडू)

कायरन पोलार्ड विरुद्ध केकेआर (17 चेंडू)

इशान किशन विरुद्ध केकेआर (17 चेंडू)

हार्दीक पंड्या विरुद्ध केकेआर (17 चेंडू)

कायरन पोलार्ड विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (17 चेंडू)

इशानचं शतक हुकलं

अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलेल्या इशानने उत्कृष्ट खेळीचे दर्शन घडवले. त्याची फलंदाजी पाहता तो नक्कीच शतक झळकावेल असे वाटत होते. पण 84 धावांवर असताना युवा गोलंदाज उम्रान मलिकने त्याची विकेट घेतली. यष्टीरक्षत साहाने त्याचा झेल घेतला. दरम्यान इशानने 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार ठोकत 84 धावा केल्या. केवळ 16 धावांनी त्याच शतक हुकलं.

हे ही वाचा

RCB vs DC Live Score, IPL 2021: विराटसेनेची टक्कर पंतच्या दिल्लीशी, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

PHOTO: दीपकने प्रपोज केलेली मुलगी कोण?, बॉलिवुडशी आहे खास नातं

T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात

(Mumbai Indian Opener Ishan Kishan Smashes Fastest 50 in IPL history in just 16 balls in SRH vs MI match)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.