एकाच शेतकऱ्याच्या 14 गाईंचा मृत्यू, इंदापुरात लाळ खुरकत रोगाचं थैमान, 200 गाईंना बाधा

इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आजारी जनावरांना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत.

एकाच शेतकऱ्याच्या 14 गाईंचा मृत्यू, इंदापुरात लाळ खुरकत रोगाचं थैमान, 200 गाईंना बाधा
इंदापुरात आतापर्यंत 51 गाईंचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 2:15 PM

इंदापूर (पुणे) : तालुक्यासह पुणे जिल्ह्यात लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आजारी जनावरांना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. या सगळ्यात शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालंय. लाळ खुरकत हा रोग संसर्गजन्य असल्याने याचा फैलाव जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाळ खुरकत रोगाचा अनेक गावांत प्रादुर्भाव

लाळ खुरकत रोगांची तालुक्यात वीसहून अधिक गावात लागण झाली आहे. त्यात सात गावात अधिक प्रभाव आहे. त्यामुळे ही बाब चिंतेची होऊन बसली आहे. गोठ्यातील गाई शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत, पाय खुडत काही क्षणात मरण पावत आहेत.

एकाच शेतकऱ्याच्या 14 गाईंचा मृत्यू

इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 3 येथील गणेश जगताप या शेतकऱ्याच्या एक-दोन गाई नाही तर, चक्क 14 गाई दोन दिवसात या लाळ खुरकत या रोगामुळे दगावल्या आहेत. तालुक्यातील लासूर्णे गावातही एका दिवसात शेतकऱ्याच्या दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. तसेच डाळज येथील अजून काही शेतकऱ्यांच्या गोठ्यात लाळ खुरकत या रोगांचे अनेक गाईना लागण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत.

200 गाईंना रोगाची लागण

इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 3, लासुर्णे, बोरी, गणेश वाडी, काझड, निमगाव केतकी, लाकडी या गावात या रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे. लाळ खुरकत या रोगाने तालुक्यात एकूण 51 गाईंचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 200 गाईंना या रोगाची लागण झाली आहे. तालुक्यातील सात गावात लाळ खुरकत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

इंदापूर तालुक्यात एकूण 1 लाख 70 हजार गाईंची नोंद आहे. या सर्व गाईंना तालुक्यातील 27 पशूसंवर्धन दवाखान्यातून लस देण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

शेतकरी हतबल

शेतीला शेतीला जोड धंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत असतात. सध्या कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच दुधाचे दर देखील घसरल्याने शेतकरी तोट्यात असतानाच लाळ खुरकत रोगाने पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ लागला आहे. पाळीव व दुधाची जनावरे दगावली असल्याने आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पशुसंवर्धन राज्यमंत्र्यांच्या गावातच अशी अवस्था, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

इंदापूर तालुक्याचे आमदार राज्यमंत्री भरणे हे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास या खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांच्याच तालुक्यात शेतकऱ्यांच्या गाई गोठ्यात तडफडून मृत्यू पावत आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी या गंभीर घटनेकडे तात्काळ लक्ष देवून पीडित शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी व या रोगावर लसीकरण मोहीम मोठ्या स्वरूपात आखावी अशी मागणी शेतकऱ्यांनकडून केली जात आहे.

(Diseases on cows in pune Indapur Death of 14 cows of a single farmer)

हे ही वाचा :

परवा एका एकराला 18 कोटी दिले, आता लोकं भेटून सांगतात, दादा तेवढा रस्ता आमच्या शेतातून न्या की…! : अजित पवार

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.