AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2025 : आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढला, तोल गेला अन्… प्रसिद्ध मंडळाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील वडगावशेरी येथे दिवाळीचा आकाशकंदील बांधताना एका तरुण कार्यकर्त्याचा तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष कुसाळ असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Diwali 2025 : आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढला, तोल गेला अन्... प्रसिद्ध मंडळाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Oct 20, 2025 | 4:14 PM
Share

राज्यात सर्वत्र दिवाळीचा आनंद उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच आता दिवाळी उत्सवाला गालबोट लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंडळाचा आकाशकंदील बांधण्यासाठी गेलेल्या एका तरुण कार्यकर्त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष कुसाळ असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. पुण्यातील वडगावशेरी परिसरात ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

संतोष कुसाळ हे पुण्यातील वडगावशेरी परिसरात गणेशनगर या भागात राहतात. संतोष हे राष्ट्रतेज तरुण मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे अत्यंत सक्रिय आणि कार्यतत्पर सदस्य होते. कोणताही सण-उत्सव असो ते कायमच पुढाकार घ्यायचे. कोणताही कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराशिवाय पूर्ण होत नसे. यंदाच्या दिवाळीसाठीही त्यांनी मंडळाच्या सजावटीत हातभार लावला होता. तसेच ऐतिहासिक किल्ला उभारणीच्या कामात मोठा वाटा उचलला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा संतोष कुसाळ हे रस्त्यावर लावण्यासाठी मंडळाचा आकाशकंदील झाडावर चढून बांधत होते. हे काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

वडगावशेरी परिसरात हळहळ व्यक्त

दरम्यान संतोष यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. एकीकडे आनंद आणि प्रकाशाचा सण साजरा होत असताना दुसरीकडे मात्र कुसाळ कुटुंबावर अंधार पसरला आहे. तसेच मंडळाचा एक आधारस्तंभ गमावल्यामुळे कार्यकर्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. या परिसरातील अनेक नागरिक दिवंगत संतोष कुसाळ यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या निधनामुळे वडगावशेरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात दिवाळीचा उत्साह

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषतः फडके रोड आणि ऐतिहासिक गणेश मंदिर परिसरात तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच पारंपरिक वेशभूषेत आलेल्या हजारो तरुण-तरुणींनी गणरायाचे दर्शन घेत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करताना दिसत आहेत. सध्या सांस्कृतिक नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य रांगोळ्या-सजावटीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?