AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाढ झोपेत होते… मध्यरात्रीच काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, 22 जखमी

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गाढ झोपेत होते... मध्यरात्रीच काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, 22 जखमी
road accidentImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2023 | 6:34 AM
Share

पुणे : खासगी बसमधून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला पडला आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचं कळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्री सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला झाला. या अपघातात 22 जण जखमी झाले. तर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

केबिनचा चक्काचूर

ही खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले. या सर्वांना ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. तर या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी दिली.

पोलिसांची कसून चौकशी सुरू

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधारप असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...