मी अडीच वर्षात एकही राजकीय वक्तव्य केलं नाही, आदित्य ठाकरे यांनी सांगितला ट्रॅक रेकॉर्ड

| Updated on: Oct 27, 2022 | 8:11 PM

मुख्यमंत्र्यांना बांधावर येऊन फिरून जाता येणार नाही.

मी अडीच वर्षात एकही राजकीय वक्तव्य केलं नाही, आदित्य ठाकरे यांनी सांगितला ट्रॅक रेकॉर्ड
Follow us on

पुणे : आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक आणि पुणे जिल्ह्यात दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे आज गेलेत. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परिस्थिती अतिशय बिकट आहे. आता तातडीनं मदत करणं गरजेचं आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफचे निकष बदलण्याची मागणी होत आहे. पण, निवडणूक आली की, असे निकष बदलत असतात. काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. बांधावर कुणी आलं नाही. कृषिमंत्री कुठं आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल.

कृषिमंत्री म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही. त्यामुळं ओला दुष्काळ म्हणजे काय हे आम्हाला कृषिमंत्र्यांनी सांगावं. 40 लोकांचा ओला दुष्काळ 50 खोक्यांनी मिटला असेल. अशी लोकांमध्ये चर्चा आहे.

मंत्र्यांकडून कुठंही गांभीर्यानं घेतलं जात नाही. मंत्री म्हणून ते जेव्हा बांधावर फिरायला येतील, तेव्हा त्यांना याचं गांभीर्य जाणवेल. तेव्हा शेतकरी त्यांना विचारेल. मला मदत म्हणून काय आणलं. हे बघायला नका येऊ हे काही टुरिझम नाही.

मुख्यमंत्री मंडळांना भेट देतात. गडचिरोलीत पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. पण, अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री दिसत नाही. घाबरले नसते तर सूरत गुवाहाटीला गेले नसते.

मुख्यमंत्र्यांना बांधावर येऊन फिरून जाता येणार नाही. बांधावर येऊन मुख्यमंत्र्यांना मदत जाहीर करावी लागेल.तरचं मुख्यमंत्र्यांनी बांधावर येणं गरजेचं आहे.

मी अडीच वर्षांत एकही राजकीय वक्तव्य केलं नाही. आम्ही लोकोपयोगी काम केलीत. कोणती काम प्रस्तावित आहेत. कोणती कामं करायची आहेत, यावरच बोलत होतो.

पायऱ्यांवर बसलो असताना मंत्री म्हणाले तुम्हाला 50 खोके पाहिजेत का. असे वक्तव्य हे विषय दुसरीकडं भरकटविण्याचा प्रकार आहे. पण, आम्ही चिकाटीनं हे विषय धरून ठेवलाय. कारण हे विषय जनतेचे आहेत. बळीराजाचे आहेत.

मुख्यमंत्री दिल्लीला जातात. हे वेदांता फॉक्सकॉनवेळी म्हटलं होतं. तिथं जाता तेव्हा स्वतःसाठीचं काहीतरी आणता का. लोकांसाठी काहीतरी आणा.

सरकार घटनाबाह्य असल्याची टीका केली जाते. यासंदर्भात जी केस सुरू आहे ती देशासाठी महत्वाची राहणार आहे. अशा गद्दारीला संविधानिक स्थान दिलात तर ते संविधानाच्या विरोधात जाईल. राज्यात वेगळीचं अंधाधुंदी माजेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

ग्लास बाजूला ठेवून मदतीला आले तर बरं होईल, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्यावर केली. सरकार कुठंय आणि दरबार कुठंय, असंही ते म्हणाले.