AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअप ग्रुप टाकला, पुण्यात खळबळ

पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणाऱ्या ठिकाणी स्मशानात अघोरी पूजा घालून त्याचा व्हिडीओ तयार करून आपल्या स्पर्धकाला त्रास देण्यासाठी तो व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानूसार गु्न्हा दाखल झाला आहे.

मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअप ग्रुप टाकला, पुण्यात खळबळ
Aghori Puja was performed at the crematoriumImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 17, 2023 | 6:03 PM
Share

पुणे | 17 डिसेंबर 2023 : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात पुन्हा अघोरी प्रकार घडला आहे. आपल्या व्यावसायिक स्पर्धेतील मित्राचा काटा काढण्यासाठी चक्क त्याच्यावर स्मशानात जाऊन अघोरी पूजा घालत या पूजेचा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या घटनेने एक खळबळ उडाली असून या प्रकरणाचा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत असतानाच अजूनही जादूटोणा, करणी, बाबा बुवा यांच्या नादाला लागण्याचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी अशा सर्वच ठिकाणी अंधश्रध्दा जोपासण्याचा सपाटा वाढत चालला आहे. असाच एक प्रकार पुण्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे घडला आहे. या ठिकाणी एकाने आपल्या प्रतिस्पर्धक मित्राचा मृत्यू होण्यासाठी चक्क स्मशानात अघोरी पूजा केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या पूजेचा व्हिडीओ चित्रित करून तो स्पर्धक मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल करण्याचा प्रकार घडला आहे.

व्हॉट्सअप ग्रुपवर व्हि़डीओ व्हायरल

लोणी काळभोर हद्दीतील गणेश चौधरी आणि त्याच्या मित्राचा सोरतापवाडी येथे प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. गेल्या एक वर्षांपासून या दोघाचे व्यवसायात वाद होत होते. या वरून आरोपी गणेश चौधरी याने सोरतापवाडीच्या स्मशान भूमीत चितेला अग्नी देण्याच्या ठिकाणी लिंबू कापून त्याला हळद कुंकू लावून अघोरी पूजा केल्याचा व्हिडीओ 22 नोव्हेंबर 2023 रोजी स्पर्धक मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. यावरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध कायदा अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा