AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ? पुण्यातून मोठी माहिती समोर; विद्यार्थ्यांमध्ये संताप!

राज्यात एकामागोमाग परीक्षेत घोळ होत असल्याचे उघडकीस येत आहे. आता पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ? पुण्यातून मोठी माहिती समोर; विद्यार्थ्यांमध्ये संताप!
PMC Junior Engineer exam paper leak
| Updated on: Aug 30, 2026 | 5:17 PM
Share

राज्यात एकामागोमाग परीक्षेत घोळ होत असल्याचे उघडकीस येत आहे. आता पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील मोठ्या व्यक्तीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे.

राज्यातील एमपीएसी परीक्षा, हायकोर्टाची लिपिक परीक्षा घोटाळ्या पाठोपाठ आता पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महानगर पालिकेतील घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या परीक्षेत गडबड झाल्याचे १६ जून रोजी निदर्शनास आले होते असे शिवसेना पक्षाचे नगर सेवक नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

पुणे महानगर पालिकेने कबुल केले होते की तीन जणांनी चिटींग केले आहे. हे चिटींग झाल्याचे समोर येऊन देखील पुणे महानगर पालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी १६९ जणांची नियुक्ती कशी काय केली असा सवाल नगर सेवक नाना भानगिरे यांनी केला आहे. परीक्षेतील पेपर आधीच बाहेर आले होते. त्यामुळे या सर्व जणांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही नियुक्ती रद्द करावी आणि पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी आणि उमेदवारांवरील अन्याय दूर करावा अशीही मागणी नाना भानगिरे यांनी केला आहे.

मुंबई हाय कोर्टाच्या लिपीक परीक्षेत गडबड

देशभरात नीटसह अनेक परीक्षेत घोटाळे होत असतानाच राज्यातही अनेक परीक्षांमध्ये घोटाळे होत असल्याचे उघडकीस येत आहे. आधी एमपीएसी परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप होत होता. त्यात मुंबई हाय कोर्टाच्या लिपीक परीक्षेत गडबड झाल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोठी निदर्शने केली होती. संभाजीनगर परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.  या निदर्शात सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कालच हायकोर्ट प्रशासनाने घेतला आहे. आणि नवीन परीक्षांची तारीख लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...