AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune cyber crime | पुण्यात आता ‘जॉब फ्रॉडचं’ जाळं, एका वर्षात अनेक तरुणांना घातला तब्बल 87 कोटींचा गंडा

शहर पोलिसांच्या सायबर गुन्हेशाखेत परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षात तब्बल 826 तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक जणांवर पोलिसांनी वर्षभरात गुन्हे दाखल केले आहेत.

Pune cyber crime | पुण्यात आता 'जॉब फ्रॉडचं' जाळं, एका वर्षात अनेक तरुणांना घातला तब्बल 87 कोटींचा गंडा
Cyber Crime
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 3:38 PM
Share

पुणे – शहरात गुन्हेगारीबरोबरच सायबर गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत आहे. परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने अनेकजणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शहरात ‘जॉब फ्रॉडचं’ जाळं निर्माण झाल्याची माहिती शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने दिले आहे. गतवर्षात सायबर गुन्ह्यांच्या 826 तक्रारीत आल्या असून त्यात तब्बल 87 कोटी रुपयांचा नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे , यामध्ये अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण?

शहरात मागील काही काळापासून सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. ओटीपीमागवून बॅंकेतून पैसे काढून घेण्याबरोबरच , परदेशी महागडे देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांची फसवणूक केली आहे. मेट्रोमेनिअल साईटवरून लग्न करण्याच्या बहाण्यानेही फसवणूक झालयाच्या घटनाची नोंद झाली आहे. या सगळया घटनांच्या बरोबर शहर पोलिसांच्या सायबर गुन्हेशाखेत परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षात तब्बल 826 तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक जणांवर पोलिसांनी वर्षभरात गुन्हे दाखल केले आहेत. वर्षभरात गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर गुन्हेगारीला बळी न पाडण्याचे आवाहन

सायबर चोरांच्या फसवणुकीला केवळ जेष्ठ मंडळीच नव्हेतर तर मोठ्या प्रमाणात तरुणाईही फसत आहे. परदेशात नोकरी मिळण्याच्या अमिषापोटी अनेक तरुण- तरुणी गैर मार्गाचा वापर करता असल्याचेही समोर आले आहे. इतकंच नव्हेत सायबर चोरट्यांचे शिकार बनत आहेत. त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाच्या, तसेच ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या जॉब ऑफर, पैश्याच्या मागणीला खात्री केल्यानंतर, सत्यता पडताळयानंतरच त्याचा स्वीकार करावा. जेणे करून तुमची होणारी फसवणूक थांबेल. गतवर्षात शहारत सायबर गुन्हयाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती पुण्याचे सायबर पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली आहे.

पातळी सोडून टीका करणं अतिशय चुकीचं – pankaja munde

Vastu Tips | वैवाहिक आयुष्यात सतत भांडणं होत आहेत? मग ज्योतिष आणि वास्तू उपाय करुन पाहा

Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची व्याप्ती वाढवणार का? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.