AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराकडे सापडली कोट्यवधींची रक्कम, आयकर विभागाची मोठी कारवाई

karnataka-assembly-election : कर्नाटक निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोकड सापडत आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला आतापर्यंत कोट्यवधींची रक्कम मिळाली आहे. आता भाजप आमदाराकडे रक्कम मिळाली आहे.

भाजप आमदाराकडे सापडली कोट्यवधींची रक्कम, आयकर विभागाची मोठी कारवाई
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 20, 2023 | 11:06 AM
Share

भूषण पाटील, कोल्हापूर : निवडणूक आली की देशात राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु असते. मग मतदार काही दिवसांसाठी राजा होतो. राजकीय पक्ष व नेते मतदारास संमोहीत करण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबतात. त्यासाठी बेहिशोबी संपत्ती म्हणजे काळा पैशांचा वापर केला जातो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. आता कर्नाटकात सत्ताधारी भाजप आमदाराकडे मोठी रक्कम सापडली आहे. या प्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे भाजप आमदार

कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत आढळली एक कोटी 54 लाखांची रोकड सापडली आहे. पोलिसांनी ही रोकड केली जप्त केली आहे. तसेच अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी अनधिकृत रक्कम मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. नुकतेच याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यानुसार कर्नाटकात केवळ आठ दिवसांत 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याचे म्हटले होते.

आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरू

कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत कोट्यवधींची रक्कम सापडल्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठे जात होती, ही माहिती पोलिसांकडून घेतली जात असताना हा काळा पैसा आहे का? याचा शोध आयकर विभाग घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सत्ताधारी आमदाराकडे सापडल्याने खळबळ उडली आहे.

का सुरु आहे तपासणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाकडून कोगनोळी टोल नाक्यावरुन जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तपासणी दरम्यान लाखोंची रोकड सापडत आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होणार आहे. त्यापूर्वी पैशांचा पाऊस सुरु झाला आहे.

कर्नाटकात मोठी रक्कम जप्त

मागील आठवड्यात कर्नाटकात जप्त केलेल्या रकमेत 22.75 कोटी रुपये रोख आहेत. 24.45 कोटी रुपयांची दारु आहे. मतदारांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची किंमत 12 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या साहित्यात रोख रक्कम, दारू, भेटवस्तूंसोबत ड्रग्जसुद्धा आहे. एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांचा समावेश आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार