AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलग तिसऱ्या दिवशी सापडली लाखोंची बेहिशोबी रक्कम, काय आहे प्रकार?

बेहिशोबी रक्कम सापडण्याचा सिलसिला कोल्हापुरात कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी लाखो रुपये सापडले आहे. हे रुपये कुठे नेले जात आहेय, हा प्रश्न आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी पैशांचा पाऊस जात आहे. परंतु महाराष्ट्रातून ही रक्कम जात आहे.

सलग तिसऱ्या दिवशी सापडली लाखोंची बेहिशोबी रक्कम, काय आहे प्रकार?
election cash
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 09, 2023 | 10:49 AM
Share

भूषण पाटील, कोल्हापूर : निवडणूक आली की देशात राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु असते. मग मतदार काही दिवसांसाठी राजा होतो. राजकीय पक्ष व नेते मतदारास संमोहीत करण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबतात. त्यासाठी बेहिशोबी संपत्ती म्हणजे काळा पैशांचा वापर केला जातो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कर्नाटकात बेहिशोबी रक्कम सापडली आहे. निवडणूक मे महिन्यात असताना आतापासून पैशांचा पाऊस सुरु असल्याचे यामुळे दिसून येत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी

निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कर्नाटकात आठ दिवसांत 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याचे म्हटले होते. आता कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापुरात लाखोंची रोकड सापडली आहे.कोल्हापुरातील कोगनोळी टोल नाक्यावर बेकायदेशीर रोकड सापडण्याचे सत्र सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी लाखोंची रोकड सापडली आहे. शनिवारी बेकायदेशीरपणे नेली जात असणारी साडेतेरा लाखांची रोकड पकडली आहे. त्यापूर्वी गुरुवारी तब्बल दीड कोटी तर शुक्रवारी साडेसात लाख रुपये सापडले होते.

का सुरु आहे तपासणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाकडून कोगनोळी टोल नाक्यावरुन जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तपासणी दरम्यान लाखोंची रोकड सापडत आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होणार आहे. त्यापूर्वी पैशांचा पाऊस सुरु झाला आहे.

कर्नाटकात मोठी रक्कम जप्त

कर्नाटकात जप्त केलेल्या रकमेत 22.75 कोटी रुपये रोख आहेत. 24.45 कोटी रुपयांची दारु आहे. मतदारांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची किंमत 12 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या साहित्यात रोख रक्कम, दारू, भेटवस्तूंसोबत ड्रग्जसुद्धा आहे. एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांचा समावेश आहे.

526 एफआयआर

धारवाड मतदारसंघातून सुमारे 45 लाख रुपये किमतीचे 725 ग्रॅम सोने जप्त केले, तर फ्लाइंग स्क्वॉड टीमने बेंगळुरू शहरातील एका मतदारसंघातून 34 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोफत वस्तू जप्त केल्या. दुसरीकडे, 6 एप्रिल रोजीच बेलागावच्या खानापूर तालुका परिसरातून 4.61 कोटी रुपये रोख आणि 395 ग्रॅम सोने (21.25 कोटी) जप्त करण्यात आले आहे. जप्तीप्रकरणी आतापर्यंत एकूण 526 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

हे ही वाचा

निवडणुकीपूर्वी आली कोट्यवधींची रोकड, मद्य अन् भेटवस्तू

बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे सापडली लाखांची रोकड, काय आहे प्रकार?

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप