AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf: तुम्ही मंचावर काय करता, हेच… अशोक सराफ यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, अगदी भावनिक विषयावर मांडलं होतं परखड मत

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेले अभिनेते अशोक सराफ हे पुन्हा एका नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशात अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ एका भावनिक आणि अगदी नाजूक विषयावर बोलत आहेत.

Ashok Saraf: तुम्ही मंचावर काय करता, हेच... अशोक सराफ यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, अगदी भावनिक विषयावर मांडलं होतं परखड मत
ashok sarafImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 6:29 PM
Share

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेले अभिनेते अशोक सराफ हे पुन्हा एका नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी गेली सहा दशके फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या आहेत तर काही अखेरपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणाऱ्या आहेत. सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ एका भावनिक आणि अगदी नाजूक विषयावर बोलत आहेत.

मराठी सिनेसृष्टी ही अप्रतिम चित्रपट, अभिनय आणि कलागुणांना वाव देणारे मंच आहे. मराठमोळ्या, दिग्गज कलाकारांनी आजवर अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. याच विषयी अशोक सराफ यांनी मोलाची गोष्ट सांगितली. हा व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीतील आहे.

अभिनेते अशोक सराफ यांच्या मुलाखतीत त्यांनी मराठी प्रेक्षकांचे मनापासून कौतुक केले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ते म्हणतात, “मराठी सिनेसृष्टीत हिरोला चेहराच नाही, हिरोला काम आहे… अभिनय कौशल्य आहे… हिंदीमध्ये तसं नाही, ते चेहरा बघतात, तुम्ही कसे दिसता? कामाचं मी काही बोलणार नाही, पण त्यांच्यासाठी चेहरा महत्त्वाचा आहे.” पुढे अशोक सराफ म्हणतात, मराठीत कोणत्याच आर्टिस्टला चेहरा विचारला जात नाही किंवा चेहऱ्यामुळे नाकारलं गेलं नव्हतं… यामध्ये वाखाणण्याची गोष्ट म्हणजे मराठी प्रेक्षक हे विचारत नाहीत तुम्ही कसे दिसता… ते पाहातात. तुम्ही तिथे काय करता, तुम्ही आम्हाला काय करून दाखवू शकता… तुमच्यात प्रेक्षकांना खूश करण्याचं, सुंदर अभिनयाचं कौशल्य आहे तर तुम्हीच आमचे हिरो… एकंदरीत म्हणूनच मराठी सिनेसृष्टी ही खास आहे.”

अशोक सराफांचे हे भावनिक वक्तव्य सध्या पुन्हा चर्चेत आलेले आहे. या व्हायरल व्हिडीओवर अनेक मराठी प्रेक्षकांच्या कमेंट्स देखील आहेत. यामध्ये अनेकांनी दिवंगत अभिनेते निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांचीही आठवण करून दिली आहे. इतकेच नाही तर सर्व मराठी कलाकारांच्या त्यांच्या कामाप्रती निष्ठेचे कौतुक केले आहे. अभिनेते अशोक सराफ हे लवकरच ‘आदि अनंत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतील, यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील झळकणार आहे.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!