दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? पूर्णेकर पत्रकार परिषदेनंतर शिंदेसेना उचलणार मोठ पाऊल
दिशा सालियान प्रकरणावरून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. यासाठी सीबीआयला पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून, वेळ पडल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरेंना दिशा सालियान प्रकरणात अटक करण्यात यावी, तुमचं नाव याप्रकरणामध्ये आहे, तुम्ही आरोपी आहात. तुम्ही आरोपी असताना एकनाथ शिंदेंवर आरोप करत आहात. आदित्य ठाकरेंना अटक व्हावी यासाठी सीबीआयला पत्र देणार आहोत. वेळ पडली तर आता आम्ही मोर्चा काढू पण आता आदित्य ठाकरेंना अटक झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले आहे.
नेमकं काय म्हणाले खासदार नरेश म्हस्के?
ठाकरे गट यांनी आज आंदोलन घेणार होते. मात्र पत्रकार परिषद घ्यावी लागली. मुंबई वरून माणसे आणावी लागली हे दुर्दैवी. राम पुर्णेकर याची भेट आदित्य ठाकरे,संजय राऊत यांनी घेतली. याचा संबंध काय कळलं नाही, असं यावेळी त्यांनी नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. मनसुख हिरेन प्रकरण त्यावेळी का नाही गेले त्यांच्या घरी सरकार होते तेव्हा तुमचे होते. तुम्ही तेव्हा वेगळं वागता आता वेगळं वागता असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
दिशा सालेन प्रकरण आदित्य ठाकरे यांना अटक करा
दरम्यान, यावेळी त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक व्हावी यासाठी आम्ही सीबीआयला निवेदन देणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार आहोत. आदित्य ठाकरे यांना अटक करण्यासाठी वेळ पडली तर आम्ही अटक करा म्हणून आम्ही मुंबई मध्ये मोर्चा काढणार असंही या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
मनसुख हिरेन प्रकरण सचिन वाझे आणि संजय राऊत बघा तेव्हा एकत्र होते. आदित्य ठाकरे आरोपी आहेत त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव घेण्याचे अधिकारी नाही. मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे स्वीकारायचा की नाही याबद्दलचा उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील. आदित्य ठाकरे ,उद्धव ठाकरे यांनी कितीही चकरा मारल्या तरी काही परिणाम होणार नाही. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता असून शिवसेना शिंदे हेच पुढे घेऊन जाऊ शकतात, असं यावेळी म्हस्के म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
