AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागड्या रीचार्जने वैतागलात ? Jio चा हा धमाल प्लान, अवघ्या 123 रुपयांमध्ये…

Jio च्या 123 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 500MB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात. तसेच JioSaavn व JioTV चा ॲक्सेसही मिळतो. पण हा प्लान Jio Phone यूजर्ससाठी आहे.

महागड्या रीचार्जने वैतागलात ? Jio चा हा धमाल प्लान, अवघ्या 123 रुपयांमध्ये...
| Updated on: Oct 29, 2026 | 6:02 PM
Share

मोबाईल रीचार्जवर तुम्हाला दर महिन्याला जास्त पैसे करायचे नाहीयेत का, तर मग जिओचा 123 रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या प्लानमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी, त्यासोबत कॉलिंग, डेटा आणि SMS सारखे फायदे आहेत. पण हे रीचार्ज करण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे. या प्लान प्रत्येक जिओ यूजरसाठी नाहीये, याचा फायदा विशेषत: Jio Phone वापरणारे ग्राहक घेऊ शकतात. तुमच्याकडेही जिओचा फीचर फोन असेल आणि तुम्हालाही कमी किमतीत कॉलिंगसह इंटरनेट वापरायचं असेल, तर या प्लानमध्ये काय -काय मिळतं ते जाणून घेऊया..

Jioच्या 123 रुपयांच्या प्लानमध्ये काय मिळणार ?

रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 123 रुपये असून, यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच, रिचार्ज केल्यानंतर जवळपास चार आठवडे तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. डेटाबाबत सांगायचं झालं तर कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 500 एमबी हाय-स्पीड डेटा देत आहे. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीनुसार, ग्राहकांना एकूण 14 जीबी डेटा मिळतो. तुम्ही मोबाईलवर हलकंफुलकं ब्राउझिंग करत असाल, मेसेज पाठवत असाल किंवा गरजेनुसार ऑनलाइन सर्व्हिसचा वापर करत असाल, तर हा डेटा तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

मात्र, दररोज मिळणारा 500 एमबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 64 केबीपीएस इतका होतो. त्यामुळे हाय-स्पीड इंटरनेटची आवश्यकता असलेली कामं करणं कठीण होऊ शकतं.

अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMSचा लाभ

या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही, तर कॉलिंग आणि मेसेजची सुविधाही मिळेल. ग्राहकांना लोकल आणि एसटीडी क्रमांकांवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जातो. याशिवाय, संपूर्ण प्लॅनच्या वैधतेदरम्यान एकूण 300 एसएमएसही मिळतात. त्यामुळे तुमचा मोबाईलचा वापर प्रामुख्याने फोन कॉल्स करण्यासाठी आणि आवश्यक मेसेज पाठवण्यासाठी होत असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल क्रमांकावर हा प्लॅन उपलब्ध आहे का आणि त्याच्या सध्याच्या अटी काय आहेत, याची खात्री करून घ्या.

JioSaavn आणि JioTV चा ॲक्सेसही मिळणार

123 रुपयांच्या या प्लॅनसोबत कंपनी दोन अतिरिक्त सुविधाही देते. यामध्ये JioSaavn आणि JioTV चा ॲक्सेस समाविष्ट आहे. यामुळे ग्राहकांना संगीत ऐकण्याची आणि उपलब्ध टीव्ही कंटेंट पाहण्याची सुविधा मिळू शकते. मात्र, या सर्व्हिसेसवरील कंटेंट आणि अॅक्सेससाठी वेगवेगळ्या अटी लागू असू शकतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अॅपवर उपलब्ध असलेली माहिती तपासणे अधिक योग्य ठरेल.

स्मार्टफोन यूजर्स ना मिळणार नाही फायदा

या रीचार्जची महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची पात्रता.. 123 रुपयांचा हा प्लान सामान्य स्मार्टफओन युजर्ससाठी नाहीये. हा प्लान फक्त Jio Phone युजर्ससाठी आहे. जर तुम्ही तुमचं जिओ सिम एखाद्या साध्या Android स्मार्टफोन किंवा iPhone मध्ये वापरत असाल तर रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लान तुमच्या नंबरवर उपलब्ध आहे की नाही ते नक्की जाणून घ्या.

जिओ फोन वापरणारे युजर्स आहेत, त्यांच्यासाठी 123 रुपयांव्यतिरिक्त 234, 369 आणि 1234 रुपयांसार्खे दुसरे रीचार्ज प्लानही उपलब्ध आहेत. त्यांची किंमत आणि व्हॅलिडिटी वेग-वेगळी आहे. प्लान निवडताना तुमची गरज तपासून बघा आणि मग रीचार्ज करा.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!