AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फेकनाथमध्ये हिंमत असती तर….’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा संताप

वडिलांची हत्या झाल्यानंतर न्याय मागायला पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेल्या राम पूर्णेकरला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

'फेकनाथमध्ये हिंमत असती तर....' प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा संताप
Aditya thakceray PC ThaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 6:03 PM
Share

खासदार नरेश म्हस्के हे शिवराळ भाषा वापरत आहेत. पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मास्टरमाईंडला वाचवायला एवढे उत्सुक का आहेत. राम पूर्णेकरांना ताब्यात घेण्यास सांगितलं. फेकनाथमध्ये हिंमत असती तर पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली असती, मास्टरमाईंडला अटक कधी होणार, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राम पूर्णेकर भेटायला गेले तर त्यांना अटक करायला सांगितलं, आमची ताकद दिसली म्हणून मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा आला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आज ठाण्यामध्ये पोहचत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ठाकरे सेनेची मागणी आहे. जवळपास एक महिना उलटला तरीही पूर्णकरांच्या हत्येप्रकरणी ठोस तपास नाही आणि मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर काही दबाव आहे का, असा सवाल ठाकरे सनेकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस ठाणे धगधगतंय, आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी ठोस तपास का होत नाही, काही दबाव आहे, का अशी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणानंतर ठाण्यामध्ये विरोधकांनी एकी केली आहे. मनसेनेही ठाकरेसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण आजमात्र टेंभीनाका परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यापूर्वी माजी खासदार राजन विचारे यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काहीच कसं बोलत नाहीत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊतांनी म्हटलं की, राज्याला मिळालेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!