काय चाललंय…कधी म्हणतात बंद…कधी म्हणतात…, 2 हजाराच्या नोटबंदीवर अजितदादांची खास शैलीत टीका

| Updated on: May 20, 2023 | 11:37 AM

Ajit Pawar : दोन हजाराच्या नोटबंदीवरुन अजित पवार यांनी केंद्र सरकार खास शैलीत घेरले. यावेळी राज्य सरकारकडून आर्थिक शिस्त बिघडवली गेल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सुडबुद्धीने काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

काय चाललंय...कधी म्हणतात बंद...कधी म्हणतात..., 2 हजाराच्या नोटबंदीवर अजितदादांची खास शैलीत टीका
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भूषण पाटील, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी खास आपल्या भाषेत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला घेरले. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रात्री दोन हजाराच्या नोटांना बंदी घातली गेली. त्यावरुन त्यांनी मोदी सरकारला घेरत आतापर्यंत असे धरसोड निर्णय कधी घेतले गेले नसल्याचे सांगितले. राज्य सरकारमधील आर्थिक शिस्त बिघडल्याची टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

काय चाललंय…

काय चाललंय हे…काल फतवा काढला 2 हजारची नोट बंद… यापूर्वी नोटबंदी झाली होती. मग त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या. परंतु काही वर्षात ही नोटबंदी पुन्हा आली. देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे. तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे. परंतु महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या पुन्हा त्यांना बदलण्यास जावे लागले. अन् विसरल्या म्हणजे गेले पैसे…दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? तेही केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

राजकारण कुठे गेले

राज्यातील राजकारण कुठे गेले आहे, हा चिंतनाचा विषय आहे. राज्यात कशी भाषा वापरली जात आहे. गद्दार, 50 खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहे. खोके, गद्दार याबाबत सत्ताधारी लोकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. काही राज्यकर्ते जाणवपूर्वक बेरोजगारी महागाईवरचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात जातीय दंगली वाढत आहेत? कोणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करताय?

राज्याची आर्थिक शिस्त बिघडली

राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली आहे. त्याला जबाबदार कोण आहे. तुम्ही काय काय केल हे जनतेला माहीत आहे. महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले. याला काय कारण आहे. जनता सगळे दाखवून देत असते. आमच्या काळात आम्ही काय त्यांची काम बंद केली नव्हती. परंतु लक्षात ठेवा कोणी ताम्रपट घेऊन आलेले नाही. कर्नाटकच्या जनतेने हे दाखवून दिले आहे.