मातृत्वापेक्षाही नेशन फस्ट, आपल्या लहान मुलास सोडून जाताना महिला जवानाचा हा व्हिडिओ पाहाच

| Updated on: Mar 16, 2023 | 3:18 PM

पुरुष जवानांच्या बरोबरीने शौर्य भारतीय महिला गाजवू लागल्या आहेत. भारतीय महिलांना एकाच पातळीवर नाही तर दोन पातळीवरची लढाई लढावी लागते. कारण प्रत्येक महिला एका माताही असते.

मातृत्वापेक्षाही नेशन फस्ट, आपल्या लहान मुलास सोडून जाताना महिला जवानाचा हा व्हिडिओ पाहाच
बीएसएफमधील जवान वर्षा पाटील
Follow us on

कोल्हापूर : जवानांच्या शौर्यागाथा आपण नेहमी ऐकत अन् वाचत असतो. भारतीय जवानांच्या असामान्य कामगिरीवर तयार झालेली परमवीर चक्र ही दूरदर्शनवरील मालिका त्या काळात प्रचंड गाजली होती. आता काळानुसार परिस्थिती बदलली आहे. संरक्षण क्षेत्राचे आकाश महिलांसाठी खुले झालेय. मग पुरुष जवानांच्या बरोबरीने शौर्य महिला गाजवू लागल्या. परंतु या महिलांना एकाच पातळीवर नाही तर दोन पातळीवरची लढाई लढावी लागते. कारण प्रत्येक महिला एका माताही असते. मग अशा वेळी कर्तव्यला प्राधान्य देत नेशन फस्ट म्हणत या रणरागिणी सीमेवर जातात. या क्षणाचा भावस्पर्शी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथील वर्षा पाटील या भारतीय सीमासुरक्षा दलात (बीएसएफ) मध्ये जवान आहे. त्या वैद्यकीय सुट्टीवर होत्या. आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून त्या पुन्हा एकदा कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जात होत्या. कोल्हापूरहून नियुक्तीच्या ठिकाणी जातानाचा कुटुंबांना निरोप देत होत्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

कारण त्या आपल्या दहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घरी सोडून जात होत्या. मग बाळाला आणि कुटुंबियांना सोडून जाताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मार्तृत्व आणि कर्तव्याचा मेळ राखत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. अर्थात महिला जवान वर्षा पाटील यांच्या यांचे सोशल मीडियात कौतुक देखील होतंय.

सर्वांना दिला एक संदेश


महिलांना कमजोर समजणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक उदाहरण आहे. महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आपले कुटुंब त्या सांभाळतातच, परंतु देशही सांभाळण्याची ताकद त्यांच्यांकडे आहे. वर्षा पाटील यांच्या सारख्या अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहे. देशाला प्रथम प्राधान्य देत, नेशन फस्टची घोषणा त्या सदैव देत आहेत.