AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking News: डॉक्टरने असं काय केलं ज्यामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्य… सत्य समोर येताच आई – वडिलांना मोठा धक्का…

Shocking News: 21 वर्षीय मुलीसोबत उपचारादम्यान डॉक्टरने असं काय केलं, ज्यामुळे तिने घेतला अखेरचा श्वास... डॉक्टरचा काळा चेहरा समोर येताच आई - वडिलांना बसला मोठा धक्का...

Shocking News: डॉक्टरने असं काय केलं ज्यामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्य... सत्य समोर येताच आई - वडिलांना मोठा धक्का...
| Updated on: Feb 09, 2026 | 11:29 AM
Share

Shocking News: साधा ताप – सर्दी झाली तरी आपण डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रुप असं देखील आपण मानतो. सध्या घडलेल्या घटनेनंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे. 21 वर्षीय तरुणीच्या निधनानंतर स्वतःला डॉक्टर म्हणत असलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला आहे. मुलगी आजारी असल्यामुळे आई – वडिलांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तरुणाच्या निधनानंतर समोर आलं की, डॉक्टर असल्याचं सांगत व्यक्ती एका रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करत होता.

उपचारादरम्यान तरुणीला चुकीचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली. विशेष म्हणजे हा वॉर्डबॉय डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. ही तरुणी वाशी येथील आहे. प्रचिती भुवड असं तिचं नाव आहे.

संदेश पाष्टे असे आरोपीचे नाव आहे. संदेश पाष्टे याचं वय 30 वर्ष आहे. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 6 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली. तरुणीच्या वडिलांनी संदेश यांनी तिच्या हॉर्मोनल आजारावर उपचार करण्यासाठी घरी बोलावलं होतं.

खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा पाष्टे डॉक्टर म्हणून अनेकांवर उपचार करत होता. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी त्यांच्या परिचयातून पाष्टेला उपचारासाठी घरी बोलवले होते. त्यानुसार त्याने तरुणीची घरी येऊन तपासणी केली आणि एक इंजेक्शन दिले होते.

मान इंजेक्शनच्या दुष्परिणामुळे तिचा त्रास वाढला. त्याने तिला पुन्हा एक इंजेक्शन दिले. त्याने तिची प्रकृती आणखी खालावली आणि मृत्यू झाला. घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर 21 वर्षाय मुलीला गमावल्यामुळे आई – वडील आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश हा अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये काम करत होता. कमी खर्चात उपचार करण्याचे प्रलोभन दाखवत चुकीची इंजेक्शने दिल्याने प्रचिती हिची प्रकृती अधिक खालावली. पीसीओडीचा तिला त्रास होता.  अंगदुखी व उलट्यांचा त्रास वाढल्याने कुटुंबाने ओळखीच्या संदेश पाष्टे याला घरी बोलावले..  त्याने केलेल्या उपचारानंतर  मुलीने अखेरचा श्वास घेतला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?