AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोटीशी वस्तू दिसली म्हणून कब्रस्तान खोदलं, त्यानंतर जे सापडलं ते पाहून सर्वांनाच बसला मोठा धक्का, पुढे थेट…

काळाच्या ओघात ज्या गोष्टी पृथ्वीच्या पोटात लुप्त झाल्या, त्याचा शोध घेण्यासाठी जगभरातल्या ऐतिहासिक ठिकाणी सतत उत्खनन सुरूच असतं. असंच उत्खनन सुरू असताना संशोधकांच्या हाती मोठी गोष्ट लागली आहे.

छोटीशी वस्तू दिसली म्हणून कब्रस्तान खोदलं, त्यानंतर जे सापडलं ते पाहून सर्वांनाच बसला मोठा धक्का, पुढे थेट...
kabristanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 10:18 PM
Share

काळाच्या ओघात ज्या गोष्टी पृथ्वीच्या पोटात लुप्त झाल्या, त्याचा शोध घेण्यासाठी जगभरातल्या ऐतिहासिक ठिकाणी सतत उत्खनन सुरूच असतं. असंच उत्खनन मध्य पूर्व आशियातील एक देश असलेल्या कजाकिस्तानमध्ये सुरू होतं. कजाकिस्तानमधील एक शहर असलेल्या अल्माटीमधील एका कब्रस्तानमध्ये हे उत्खनन सुरू होतं. हे उत्खनन सुरू असतानाच या क्षेत्रातील तज्ज्ञांची नजर एका छोट्याशा वस्तूवर पडली. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आणखी खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे खोदकाम पूर्ण झालं तेव्हा त्यांना तिथे संपूर्ण सोन्याच्या धातूचं एक अस्वल आढळून आलं. समोर आलेल्या माहितीनुसार हे सोन्याचं अस्वल तब्बल 2200 वर्ष जुनं आहे. प्राचीन काळात काही लुटारूंच्या टोळ्यांनी या ठिकाणी असलेल्या एका मकबाऱ्याची तोडफोड केली होती, हा मकबारा पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता. याच ठिकाणी रिसर्च सुरू असताना हा खजाना येथील संशोधकांच्या हाती लागला आहे.

हे सोन्याचं अस्वल आपल्या मागच्या दोन पायावर उभा आहे. त्याचे पुढचे दोन पाय हे हवेत आहेत. या अस्वलाच्या हातात एक भांड आहे, ते पण संपूर्णपणे सोन्याचच आहे. या अस्वलाबद्दल सांगताना संशोधकांनी सांगितलं की जेव्हा राजा आपल्यासाठी पोशाख शिवायचा तेव्हा त्या पोशाखामध्ये या प्रकारच्या अस्वलाच्या मूर्ती लावल्या जायच्या, त्यातीलच हे एक अस्वल असावं. दरम्यान या अस्वालामुळे आता संशोधकांना दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास समजून घेण्यास मदत होणार आहे.

सरकारची प्रतिक्रिया

दरम्यान याबाबत बोलताना येथील सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. हे सोन्याचं अस्वल अंदाजे 2200 वर्ष जुनं असावं असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे, तसेच पूर्वीचे राजे हे आपला पोशाख शिवताना डोक्यावर जी टोपी घालत त्यामध्ये अशा प्रकारच्या कलाकृती देखील लावत होते, त्यातीलच ही एक कलाकृती असावी, असं येथील सरकारने म्हटलं आहे. एका कब्रस्तानामध्ये उत्खनन सुरू असताना हे सोन्याचं अस्वल आढळून आलं आहे, दरम्यान या कब्रस्तानामध्ये माणसांचे हाडे देखील मोठ्या संख्येमध्ये आढळून आले आहेत. जे पाहून संशोधकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'