AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Chalisa : वाद टळला… पुण्यातला मनसेचा हनुमान चालिसा कार्यक्रम रद्द

पोलिसांनी (Police) समज दिल्यानंतर पुण्यात मनसैनिकांनी (MNS activist) स्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार होता.

Hanuman Chalisa : वाद टळला... पुण्यातला मनसेचा हनुमान चालिसा कार्यक्रम रद्द
मीठगंज पोलीस ठाण्याबाहेर मनसे लावणारे होते स्पीकर्सImage Credit source: Tv9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 04, 2022 | 10:12 AM
Share

पुणे : पोलिसांनी (Police) समज दिल्यानंतर पुण्यात मनसैनिकांनी (MNS activist) स्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार होता. मनसेच्या कसबा पेठ शाखेचे सूरज पंडित यांनी या कार्यक्रमाविषयी सांगितले होते. मात्र, मनसेचे स्पीकर मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर लावण्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना समज दिली. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली. पोलिसांनी समज दिल्यानंतर हा प्रकार टाळल्याने होणारा वादंगही टळला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी हा वादग्रस्त कार्यक्रम आयोजित केला होता.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बदलली भूमिका

मनसेच्या कार्यकर्त्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मनसेने ही भूमिका घेतली आहे. दरम्यान, या भूमिकेमुळे होणारा संभाव्य वाद टळला आहे.

काय आहे वाद?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (masjid loudspeaker) हटवण्यासाठी दंड थोपटले. राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिले. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे युरोपातील शासन आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.

पाहा व्हिडिओ

आणखी वाचा :

Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

Video : अजितदादांनी भरसभेत कोणाला हात जोडले? इंदापूर तालक्यातील सभेमध्ये नेमकं काय घडलं?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...