Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला

पुणे (Pune) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला (Khadakwasla) धरणात तरुणांनी केलेली हुल्लडबाजी एका युवकाच्या जीवावर बेतली आहे.

Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला
नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 6:31 AM

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला (Khadakwasla) धरणात तरुणांनी केलेली हुल्लडबाजी एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. खडकवासला धरणात मित्रांबरोबर पोहताना केलेल्या हुल्लडबाजीमुळं 18 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून (Youth Drown) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळावर दाखळ होतं पाण्यातून युवकाचा मृतदेह शोधून काढला. योगेश नवले असं त्या युवकाचं नाव असून तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. कामासाठी योगेश नवले पुण्यात आला होता. योगेश नवले त्याच्या चार मित्रांसह सुट्टी असल्यानं पोहण्यासाठी खडकवासला धरणात गेला होता.

कधी घडली घटना

योगेश नवले आणि त्याचे चार मित्र पोहण्यासाठी खडकवाला धरणात गेले होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली घटना असल्याच समोर आलं आहे.योगेश नवनाथ नवले (वय 18, रा. बिबवेवाडी, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश पाण्यात बुडाल्यानंतर ही माहिती पोलीस आणि पीएमआरडीए प्रशासन, अग्निशमन दल आणि हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शोधून काढला.

योगेश मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील

योगेश नवले हा युवक मुळचा अहमदनगरच्या राशिन येथील होता.योगेश कामासाठी पुण्यात आलेला होता. तो रविवार पेठेतील एका दुकानात कामाला होता, रविवारी सुट्टी असल्याने तो त्याच्या इतर चार मित्रांसह खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेला होता. धरण परिसरात केलेल्या हुल्लडबाजीमुळं योगेश नवले याला जीव गमवावा लागला आहे.

पाच मित्रांची हुल्लडबाजी

रविवारी कामाला सुट्टी असल्यानं योगेश नवले आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी खडकवासला धरणात गेले होते. योगेश व इतर चौघे चौपाटीजवळ खडकवासला धरणात उतरले होते, अशी माहिती आहे. पाचही मित्रांची मिळून पाण्यात हुल्लडबाजी सुरू असल्याची बाब देखील समोर आली आहे. मित्रांनी बाहेर आल्यावर अंगाला माती लावल्याने योगेश अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरला अन त्याचा बुडून मृत्यू झाला. हवेली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या भाषणानंतर वातावरण बदललं, भाजप मनसेची जवळीक वाढणार?

Skin care : व्हिटॅमिन सी उन्हात त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या याबद्दल!

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.