Maharashtra News Live Update : शेतातील आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

| Updated on: Apr 04, 2022 | 10:57 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : शेतातील आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर राज्यातील राजकीय चित्र झपाट्यानं बदललं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या समर्थनार्थ भाजप नेते पुढं आल्याचं चित्र रविवारी पाहायला मिळालं. दुसरीकडे मनसेच्यावतीनं मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन तीव्र केलं जाणार का हे पाहावं लागणार आहे. कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभेच्या पोटनिवडणुकीची देखील राज्यात चर्चा आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज त्या कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 04 Apr 2022 09:31 PM (IST)

  नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

  नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

  उसाला लागलेली आग विझवायला गेले असता आगीत होरपळून मृत्यू …

  संजय एकनाथ चौधरी असंमयत शेतकऱ्याचे नाव …

  संजय चौधरी हे उसाला लागलेली आग गाव्हाला लागू नये त्यासाठी विझवण्यासाठी गेले असताना आगीत भाजून मृत्यू…

  सारंखेडा पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद…

  घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ…

  वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे संजय चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप…

 • 04 Apr 2022 08:50 PM (IST)

  राजधानीत शिवसेना खासदारांची खलबतं!

  नवी दिल्ली शिवसेना खासदारांची बैठक

  महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांची बैठक

  संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक

  महाराष्ट्रातील सर्व शिवसेनेचे खासदार बैठकीला उपस्थित

  प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित

 • 04 Apr 2022 08:05 PM (IST)

  नग्नावस्थेत डोकं छाटलेले युवतीचं शव मिळाल्यानं चंद्रपुरात एकच खळबळ

  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात खळबळ

  नग्नावस्थेत असलेले डोकं छाटलेले युवतीचे शव मिळाले

  भद्रावतीच्या ITI मागील भागतील घटना

  भद्रावती पोलीस- फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

  युवतीचे निर्दयपणे डोके उडविल्याचे स्पष्ट

  खळबळजनक घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी,

  युवती कोण? याचा तपास सुरु

 • 04 Apr 2022 06:48 PM (IST)

  सोलापुरात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 जखमी

  – सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात भीषण अपघात

  – पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतत असताना बेल्लाळे कुटुंबीयांचा अपघात

  – अपघातात सोलापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

  – दयानंद बेलाळे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव

  – पोलिस कर्मचारी दयानंद बेलाळे यांच्यासह त्याचा भाऊ सचिन बेलाळे यांचाही मृत्यू

  – मोहोळमध्ये भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

  – मोहोळ तालुक्यातील सारोळी पाटीनजीक झाला भीषण अपघात

  – अपघातात पोलिस कर्मचारी आणि त्याच्या भावाचा मृत्यू

  – तर अपघातात बेलाळी यांच्या पत्नी आणि भावजयी देखील गंभीर जखमी

 • 04 Apr 2022 06:46 PM (IST)

  ट्रकची धडक, महिलेनं गमावले पाय!

  नांदेडमध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एका महिलेचे पाय तुटल्याची गंभीर घटना घडलीय. चुकीच्या रस्त्याने ट्रक मागे घेताना दुचाकीला धडकल्याने हा अपघात झालाय. या अपघातात परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथल्या सरोजाबाई देवकर या महिलेने पाय गमावलेत, तर पती आणि मुलगा जखमी झालाय. मुदखेडहून जिंतूरकडे हे तिघे जण आपल्या गावी दुचाकीवर जात होते. त्यावेळी हा अपघात झालाय.

 • 04 Apr 2022 06:30 PM (IST)

  गृहखातं शिवसेना आपल्याकडे घेणार? मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत

  महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळात होणार मोठे बदल

  सूत्रांची माहिती

  लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार

 • 04 Apr 2022 06:25 PM (IST)

  अकोल्यात मनसेला धक्का, मनसेचा ‘आदित्य’ आता शिवसेनेत

  अकोल्यात मनसेला धक्का

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुडीपाडवा मेळावा नंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय माणले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश….

  आदित्य दामले यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष रणजित राठोड आणि मनविसेचे शहर अध्यक्ष सुरज पातोंड यांचा ही सेनेत प्रवेश….

  पक्षातील नाराजीमुळे घेतला मनसेला रामराम

  पूर्वी 6 वर्ष भरतीय विद्यार्थी सेनेत आणि मनसेच्या पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत….

  आदित्य ठाकरे आणि आदित्य शिरोळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश….

 • 04 Apr 2022 03:23 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस 

  – आपला आवाज दाबू शकतो नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मत नाही ( बोलताना माईक बंद झाला होता )

  – आमचा आवाज जनता आहे

  – जनतेवर अन्याय सहन करणार नाही, अन्याय झाला तर ही जनता तक्त पालटून टाकेल

  – नजआक्रोश मोर्चाचाची सुरुवात गडचीरोलीतून केली

  – या सरकार मध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मंच चाललीय. दोन्ही टीम यांच्याच आहे

  – जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार

  – 2024 ला भाजप बहूमताचं सरकार असेल,

  – 2024 च्या आधी आम्ही म्हटलं की सरकार आणतो तर यांना वाटत आपलं सरकार पडते की काय. आणि भ्रष्टाचार करायला लागतात

  – मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि वीज द्या शेतकऱ्यांना.

  – पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबानी आहे कारण ते त्यांना मालपानी ते देतात

  – कोरोनात यांनी बारमालकांचं भलं केलं

  – या सरकारने 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली

  – विदेशी दारुवरचा कर अर्धा करण्याचं काम या सरकार ने केलं

  – या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं, त्यांना बेवड्यांचं हीत जास्त आहे

  – सर्वसामान्यांना या सरकारने मदत केली नाही

  – कोरोनात वेशांना द्यायचे पैसे यांनी ते आपल्या नातेवाईकांना दिले

  – वेशांना द्यायच्या पैशावर डल्ला वापरणाऱ्यांना काय म्हणतात. संजय राऊत तो शब्द नेहमी वापरतात. अशे काही लोक या सरकारमध्ये आहे

  – सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत

  – आमच्या शेतकऱ्यांना धाणाचा बोणस हे सरकार देत नाही

  – कोरोनाच्या २४ महिन्यात शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी ४०० कोटी रुपयांचे संपत्ती घेतली

  – यशवंत जाधव म्हणतात मला १० टक्केच मिळाले ९० टक्के कुठे गेले हे सर्वांना माहित आहे

  – धानाचं बोणस द्यायला यांच्याकडे पैसे नाही

  – तुम्ही आम्हाला निवडून दिलं, पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून हे सरकार आलं.

  – धोक्यातून आलेलं हे सरकार सामान्य माणसांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे

  – या सरकारला वठणीवर आणण्यासाठी हे सरकार आहे

 • 04 Apr 2022 03:03 PM (IST)

  पुणे

  – पुणे जिल्हा दूध संघावर अध्यक्षपदी केशरबाई पवार,

  – तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर

  – दूध संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला,

  – पुणे जिल्हा दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व,

  – अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नावांवर शिक्कामोर्तब

 • 04 Apr 2022 02:53 PM (IST)

  सुधीर मुनगंटीवार

  – भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( सुधीर भाऊ कडून उल्लेख )

  – या सरकारला गडचीरोलीचा झटका देण्यासाठी आलेले बांधव

  – तक्त बदलतो, ताज बदलतो इन बेईमानोंका राज बदल दोन

  – आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काम करणारे सरकार असायचे, मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काम करणारे असायचे

  – आता खुर्चीप्रघान मुख्यमंत्री आले. म्हणून लोक म्हणतात उद्धवा अजब तुझे सरकार

 • 04 Apr 2022 02:45 PM (IST)

  चंद्रशेखर बावनकुळे

  – या सरकारने १५ लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

  – शेतकऱ्यांना वीज दिल्याने कंपनी डुबत नाही, भ्रष्टाचार केल्याने कंपनी डुबते

  – शेतकऱ्यांना वीज देणे, चुक आहे

  – उद्या फडणवीस सरकार आल्यावर पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही. शेतकऱ्यांना वीज देणार

  – भाजपच्या सरकारच्या काळात भारनियमन झालं नाही

 • 04 Apr 2022 02:24 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस 

  या सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला

  शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची Z टीम आहे का?

  राज ठाकरे आणि माझी भेट होणार आहे

  शेतकऱ्यांच्या मुद्यावर प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करणार

 • 04 Apr 2022 01:17 PM (IST)

  नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ

  नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत

  नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी 18 एप्रिलपर्यंत वाढवली

 • 04 Apr 2022 12:51 PM (IST)

  महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या दोन दिवसात सुरु झाली : उद्धव ठाकरे

  मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा छंद

  आगगाड्या आल्या, कामगार कोळसा टाकत राहायचे

  लहाणपणी गाणं होतं, धुरांच्या रेषा लांबून पाहताना बरं वाटायचं

  आज आपलं लक्ष गेल्यानं धूर टाकण्याऱ्या गाड्या बंद झाल्या

  महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या दोन दिवसात सुरु झाली होती

  आरोग्यदायी जीवन कसं प्राप्त करु शकतं याबाबत विचार करतोय

  पुण्यानं नेतृत्त्वं स्वीकारलंय

  नागपूर , मुंबई आणि मराठवाड्यात परिषदेचे आयोजन करु

  आपण करतोय त्याबद्दल जनजागृती करु

  आजच्या चर्चासत्रात पर्यायी इंधनासंबंधात काम करत आहोत

 • 04 Apr 2022 10:22 AM (IST)

  महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांची शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी

  शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्या डिनर मिटींगचे आयोजन

  मविआ खासदार उपस्थित राहण्याची शक्यता

  राज्यातील आमदारही उपस्थित राहणार

  प्रशिक्षणासाठी राज्यातील आमदार आज दिल्लीत येणार

  खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदार पवारांच्या घरी हजेरी लावणार

  काँग्रेस चे खासदारही उद्या स्नेहभोजन ला जाणार

 • 04 Apr 2022 10:05 AM (IST)

  अकोला ते दर्यापूर रोडवर अपघात

  अकोला ते दर्यापूर रोडवर अपघात….

  या अपघातात एकाचा मृत्यू….

  घुसर फाट्याजवळ झाला अपघात….

  ट्रक आणि बाईची ची समोरासमोर धडक होऊन झाला अपघात….

  यात बाईक स्वारचा जागीच मृत्यू….तर एक जण गंभीर जखमी….

 • 04 Apr 2022 10:04 AM (IST)

  चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथे पुन्हा आढळला धातूचा बलून

  सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथे पुन्हा आढळला धातूचा बलून,

  काल सकाळी पवनपार येथे आढळलेल्या धातूच्या बलून सारखाच आहे हा बलून,

  काल दुपारी मोहफूल वेचताना काही ग्रामस्थांना आढळला हा बलून, जिल्हा प्रशासनाने हा बलून देखील घेतला आपल्या ताब्यात,

  आता पर्यंत कोसळलेल्या सॅटेलाईट चे सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रिंग तर पवनपार आणि मरेगाव येथे आढळले आहे धातूचे बलून,

  सिंदेवाही तालुक्यात अशा प्रकारचे आणखी काही भाग मिळतात का याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून सुरु आहे प्रयत्न

 • 04 Apr 2022 09:47 AM (IST)

  कोल्हापूर उत्तरचीच कशाला, गोव्यात पाच राज्यात पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा : संजय राऊत

  अशा अनेक गाठी भेटी होत असतात

  आमच्याकडे अनेक लोक येतात, अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही

  मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीनं लढेल आणि जिंकेल

  मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले कारनामे केले तरी आम्ही  निवडणूक जिंकू

  कोल्हापूर उत्तरचीच कशाला, गोव्यात, पाच राज्यात पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा

  पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी ईडी लावणं गरजेचं आहे

  गोव्यातले पणजी मतदारसंघ आणि साखळी या दोन्ही मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर त्याचं स्वागत करु

  महाराष्ट्रात नंतर बघू सुरुवात पाच राज्यांतून करावी

  चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला तर खांद्याला खांदा लावून काम करु

  शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत

  देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत

  शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढं जाऊ शकत नाही

  शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय, विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही

 • 04 Apr 2022 08:36 AM (IST)

  सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान

  सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान

  कारागृहातील ट्यूबलाइट सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड करून केले नुकसान …

  विकास भिमराव बैले राहणार पाटण असे कैद्याचे नाव…

  संबंधित कैद्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

 • 04 Apr 2022 08:36 AM (IST)

  रत्नागिरीत आजपासून हेल्मेट सक्ती नाही

  रत्नागिरीत आजपासून हेल्मेट सक्ती नाही

  पुणे पॅटर्नच्या धर्तीवर रत्नागिरीत हेल्मेट सक्ती नाही

  जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेंट सक्तीपुर्वी प्रबोधन करण्याचे काढले आदेश

  हेल्मेट सक्ती विरोधात रत्नागिरीकरांची होती तीव्र नाराजी

  हेल्मेट शिवाय दुचाकीवरून फिरल्यास होत होता मोठा दंड

  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हेल्मेट सक्ती विरोधात उचलला होता आवाज

 • 04 Apr 2022 07:54 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

  कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

  नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती सह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच आंदोलन

  लक्षणीय संपाची दखल न घेतल्यान महसूल कर्मचाऱ्यांनी आता उचललं बेमुदत संपाच हत्यार

  कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे महसूलच्या विविध कार्यालयातील कामकाज होणार ठप्प

 • 04 Apr 2022 07:24 AM (IST)

  आता घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्राचा परवाना

  आता घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्राचा परवाना

  नागपूर विभागात वितरित झाले 88 डिजिटल परवाने

  कृषी केंद्राचा परवाना मिळविण्यासाठी आता कृषी विभागाच्या चक्कर मारण्याची गरज नाही

  कृषी विभाग आधुनिकतेची कास धरत आहे

  ऑन लाईन अर्ज केल्या नंतर नियमात असेल त्याला अगदी कमी वेळात परवाना प्राप्त होणार

  खते बियाणे , परवाना यासाठी आपले सरकार पोर्टल वर यावर्षी पासून सुविधा कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली

 • 04 Apr 2022 07:01 AM (IST)

  नाशिकमध्ये रेल्वे रुळावरुन घसरल्यानं वेळापत्रकात बदल

  लहवित स्थानकाजवळ ट्रेन क्रमांक 11061 रुळावरून घसरल्याने काही गाड्या रद्द/छोट्या टर्मिनेटेड करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या खालीलप्रमाणे आहेत रद्द केलेली ट्रेन 1) ट्रेन क्रमांक 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस JCO 03.04.2022 रोजीचे प्रस्थान स्थानक रद्द केले आहे. २) ट्रेन क्रमांक – १२१४६ पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ – ०५.०४.२०२२ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. 3) ट्रेन क्र.-12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस JCO- 03.04.2022 रोजी निघणारी स्टेशन रद्द करण्यात आली आहे. 4) गाडी क्रमांक – 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस JCO – 03.04.2022 रोजी निर्गमन स्टेशनवरून रद्द करण्यात आली आहे. 5) ट्रेन क्रमांक – 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO – 03.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकातून रद्द करण्यात आली आहे 6) ट्रेन क्रमांक – 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस JCO – 03.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकातून रद्द करण्यात आली आहे. 7) ट्रेन क्रमांक – 17612 मुंबई – नांदेड एक्सप्रेस JCO – 03.04.2022 रोजी निर्गमन स्टेशनवरून रद्द करण्यात आली आहे. 8) ट्रेन क्रमांक – 17611 नांदेड – मुंबई एक्सप्रेस JCO – 04.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. 4) ट्रेन क्रमांक – 17617 – नांदेड – मुंबई एक्सप्रेस JCO – 04.04.2022 मुंबई – मनमाड बीच रद्द राहील आणि लहान मूळ पूर्व मनमाड ते नांदेड गाड्या वळवल्या १) गाडी क्रमांक – १२१४३ लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर एक्सप्रेस जेसीओ ०३.०४.२०२२ वसई रोड – सुरत – जळगाव (पुढे योग्य मार्गाने) २) गाडी क्रमांक – १२८०९ मुंबई – हावडा एक्सप्रेस जेसीओ ०३.०४.२०२२ ही कल्याण – लोणावळा – पुणे – दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने) ३) ट्रेन क्रमांक – १२१३७ मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल एक्सप्रेस JCO ०३.०४.२०२२ वसई रोड, नागदा, मुक्तसर, भोपाळ मार्गे वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने) ३) गाडी क्रमांक – १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने) ४) गाडी क्रमांक – १३२०२ मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्सप्रेस दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने)

  शॉर्ट टर्मिनेट ट्रेन 1) ट्रेन क्रमांक – 11402 आदिलाबाद – मुंबई एक्सप्रेस JCO – 04.04.2022 नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेटेड आणि खाली दिशेने विशेष ट्रेन म्हणून परतली

  2) ट्रेन क्रमांक – 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्स्प्रेस JCO – 03.04.2022 रोजी प्रस्थान स्टेशन नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेट झाली आणि नांदेडला परतली 3) ट्रेन क्रमांक – 12106 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस JCO – 03.04.2022 भुसावळ येथे शॉर्ट टर्मिनेट झाली आणि 12105 मार्गावर विशेष ट्रेन EX BSL म्हणून कामावर परत आली. ४) गाडी क्रमांक – १७६१८ नांदेड – मुंबई एक्सप्रेस जेसीओ – ०३.०४.२०२२ मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेटेड

  8 गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यात पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस,12146 पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस, 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस,12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस,17612 मुंबई – नांदेड एक्सप्रेस,17611 नांदेड – मुंबई एक्सप्रेस, 17617 – नांदेड – मुंबई एक्सप्रेस

  10 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर मुंबई – हावडा एक्सप्रेस, मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्सप्रेस दौंड यासह इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे

 • 04 Apr 2022 07:00 AM (IST)

  पंचवटी एक्स्प्रेस,राज्यरणी,देवगिरी,नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द

  नाशिक – पवन एक्स्प्रेस दुर्घटना

  पंचवटी एक्स्प्रेस,राज्यरणी,देवगिरी,नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द

  तर मुंबई हुन येणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गाने केल्या डायव्हर्ट

  दुर्घटनेनंतर ट्रॅक रिपेअरिंग च्या कामाला सुरुवात

 • 04 Apr 2022 06:48 AM (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांचं सीएसएमटी स्टेशनबाहेर आंदोलन

  मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर एसटी कर्मचार्यांचं टाॅयलेट आंदोलन सुरू… शेकडो एसटी कर्मचारी रस्त्यावर बसले…

  – भर रस्तेयात एसटी कर्मचारी बसले शौचास…

  – पोलिस आणि प्रशासनाची ऊडाली झोप..

  – शौचाची सोय , आंघोळीची सेय नसल्याने एसटी करामचार्यांचा आक्रमक पवित्रा…

  – सरकार कुठे शौचास जायचं असा विचारला सवाल…

 • 04 Apr 2022 06:32 AM (IST)

  बारामती-दौंड-पुणे- बारामती दरम्यान ”मेमू” रेल्वेस मंजुरी

  बारामती-दौंड-पुणे- बारामती दरम्यान ”मेमू” (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट ट्रेन) रेल्वेस मंजुरी

  येत्या 11 एप्रिलपासून ही मेमू रेल्वे प्रत्यक्षात धावणार असल्याची रेल्वे मंत्रालयाची माहिती

  पुणे ते बारामती दरम्यान ”मेमू” सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार

 • 04 Apr 2022 06:31 AM (IST)

  इंधन दरवाढीमुळे ‘उबर’ने पुण्यातही प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांनी केली वाढ

  इंधन दरवाढीमुळे ‘उबर’ने पुण्यातही प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांनी केली वाढ

  कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली

  इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने नाइलाजाने निर्णय घेतल्याचे उबरने केलं स्पष्ट

  इंधनदराच्या चढ-उतारावर कंपनीचे लक्ष आहे. त्यानुसार आगामी काळातही प्रवाशांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले

 • 04 Apr 2022 06:08 AM (IST)

  राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, धरणातील पाणीसाठा 10 टक्क्यांनी घटला

  राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने महिन्याभरात राज्यात धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट

  राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट

  मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक

  पुणे विभागातील धरणात सर्वाधिक 68 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Published On - Apr 04,2022 6:07 AM

Follow us
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.