चांगली बातमी, नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरात, IMD ने सांगितले पुढे कशी असणार मान्सूनची चाल

| Updated on: May 20, 2023 | 9:37 AM

Monsoon Update : मे महिन्यात heat wave चांगलीच जाणवत आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. परंतु हवामान विभागाने आता थंड करणारी बातमी दिली आहे. नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे.

चांगली बातमी, नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरात, IMD ने सांगितले पुढे कशी असणार मान्सूनची चाल
Follow us on

पुणे : मे महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमान चांगलेच तापू लागले आहे. राज्यांमधील अनेक शहरांमध्ये मे हिटचा तडखा बसत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या उन्हापासून कधी दिलासा मिळणार? मान्सून कधी येणार? याकडे शेतकरी वर्गच नाही तर सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात चांगली बातमी हवामान विभागाने केली आहे.

नैऋत्य मान्सून आगमन

नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात १९ मे रोजी आगमन झाले. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात,अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली.

तीन दिवस आधीच मान्सून

मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहचला आहे. यामुळे यावर्षी मान्सून तीन दिवस उशीरा येणार होता. परंतु आता त्याची चाल अनुकूल राहिली तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. हवामान विभागाने केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

किती पडणार पाऊस

दिर्घकालीन अंदाजानुसार राज्यात ९६% पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.

पुणे तापमान ४० वर

पुणे शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. शहरातील तापमान पुन्हा चाळीशीवर गेलंय आहे. पुढील दोन दिवसात आणखी तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येतोय. शुक्रवारी कोरेगाव पार्क परिसरात 41अंश सेल्सिअस एवढं तापमान होते. शहराच्या जवळपास सगळ्याच भागात तापमान चाळीशीच्या जवळ होते.