AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरच्या गाढवांनी नशीब काढलं! निघाले थेट उटीला

त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत.

पंढरपूरच्या गाढवांनी नशीब काढलं! निघाले थेट उटीला
| Updated on: Jan 11, 2021 | 3:09 PM
Share

पंढरपूर : पंढरपूरच्या भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांवर पंढरपूर (Pandharpur Donkey Sent To Ooty) पोलिसांनी कारवाई केली होती. आता त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या गाढवांचं नशीब चमकल्याचं म्हटलं जात आहे (Pandharpur Donkey Sent To Ooty).

नेमकं प्रकरण काय?

पंढरपूर येथील भीमा नदीपात्रातून वेगवेगळ्या तीन ठिकाणावरुन गाढवांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात होता. त्या दरम्यान, पंढरपूर पोलीस प्रशासनाकडून त्या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांना पकडण्यात आले होते.

पंढरपूर प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार या गाढवांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेच्यादृष्टीने थंडहवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उटी (तामिळनाडू), येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड नेचर संस्था, निलगिरी या संस्थेमध्ये रवाना करण्यात आली आहेत.

गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंढवाडा नसल्याने या गाढवांना चक्क थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच उटी येथे पाठवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच, गाढवं पळून जाऊ नये, यासाठी दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Pandharpur Donkey Sent To Ooty

संबंधित बातम्या :

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही

राणीबागेतील प्राणीपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल, ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’ देऊन सन्मान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.