राणीबागेतील प्राणीपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल, ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’ देऊन सन्मान

प्राणी संग्रहालयातील विविध पदांवर कार्यरत 4 कर्मचाऱ्यांना ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’प्रदान करण्‍यात आले आहे.

राणीबागेतील प्राणीपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल, ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’ देऊन सन्मान
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 11:40 PM

मुंबई : ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात देशभरातील सर्व प्राणी संग्रहालयांमध्‍ये (Animal Keeper Gurunath Narvekar) ‘वन्‍यजीव सप्‍ताह’साजरा केला जातो. या वर्षी वन्‍यजीव सप्‍ताहाच्‍या निमित्‍ताने ‘केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्‍ली’ यांच्‍यामार्फत प्राणी संग्रहालयांमध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सन्‍मान पूर्वक दखल घेतली जावी, या उद्देशाने यंदाच्‍या वन्‍यजीव सप्‍ताहापासून ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’ देण्‍यात येत आहेत. यावेळी भायखळा येथील राणीबागेतील प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला (Animal Keeper Gurunath Narvekar).

यावर्षी प्राणी संग्रहालयातील विविध पदांवर कार्यरत 4 कर्मचाऱ्यांना ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’प्रदान करण्‍यात आले आहे. यामध्‍ये ‘प्राणीपाल’ पदावर गेली तब्‍बल 30 वर्षे कार्यरत असणाऱ्या गुरुनाथ नार्वेकर यांचाही समावेश आहे.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍या हस्‍ते बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ येथे ‘प्राणीपाल’ (Animal Keeper) पदावर कार्यरत असणारे गुरुनाथ नार्वेकर यांना ‘प्राणिमित्र पुरस्‍कार 2020’ देऊन आज गौरविण्‍यात आले आहे. नवी दिल्‍ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्‍याद्वारे ऑनलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या सोहळयात गुरुनाथ नार्वेकर यांना प्रमाणपत्र, सन्‍मान चिन्‍ह आणि रोख रक्‍कम देऊन सन्‍मानित करण्‍यात आले (Animal Keeper Gurunath Narvekar).

देशभरातील 151 प्राणी संग्रहालयांमध्‍ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून 4 कर्मचाऱ्यांची निवड यंदाच्‍या पुरस्‍कारासाठी करण्‍यात आली असून यामध्‍ये नार्वेकर यांचा समावेश आहे.

प्राणीपाल या पदावर कार्यरत असताना नार्वेकर यांनी गेल्‍या 30 वर्षांमध्‍ये विविध प्राणी-पक्ष्‍यांची मनोभावे सेवा केली आहे. तर ‘पशुवैद्यकीय व्रणोपचारक’पदी पदोन्‍नती मिळाल्‍यानंतर नार्वेकर यांनी प्राणी संग्रहालयातील वन्‍यप्राण्‍यांची आरोग्‍यविषयक देखभाल, औषधोपचार आदी कामे करतानाच सध्‍याच्‍या ‘कोव्हिड-19’साथरोगाच्‍या काळात देखील एकही दिवस सुट्टी न घेता प्राणी संग्रहालयातील वन्‍यप्राण्‍यांविषयीच्‍या सर्व जबाबदाऱ्या उत्‍तमरित्‍या पार पाडल्‍या आहेत. डिसेंबर 2020 मध्‍ये महापालिकेतून सेवानवृत्‍त होत असलेले गुरुनाथ नार्वेकर यांना त्‍यांनी केलेल्‍या अविरत सेवेकरिता त्‍यांना सदर पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात आले आहे (Animal Keeper Gurunath Narvekar)

संबंधित बातम्या :

वर्धा-हिंगोलीत प्राणी क्वारंटाईन करण्याची वेळ, साडेतीन हजार गुरांना लम्पी त्वचारोग

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.