AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली

राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर मात्र पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे.

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली
पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवारांनी एक जागा गमावली
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Jan 04, 2022 | 1:47 PM
Share

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून 52 मतं मिळाली आहेत, त्यामुळे “साथ कोणी दिली? बारामती” अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.

प्रतिष्ठेची लढत, राष्ट्रवादीचा पराभव

राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.

कोणी कुठली जागा जिंकली

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.

विजयाचा गुलाल, राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने

निवडणुकीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धावतच रस्त्यावर गुलाल उधळून आनंदाला वाट मोकळी करून दिली. ढोलताशे वाजवत या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सात जागांसाठी रविवार, दोन जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती.

कोणाकोणाची बिनविरोध निवड

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

शिरुर

अशोक पवार -109 आबासाहेब गव्हाणे- 21

मुळशी

सुनील चांदेरे- 27 आत्माराम कलाटे- 18

हवेली

विकास दांगट- 73 म्हस्के-58

संबंधित बातम्या :

अजितदादांनी ज्या प्रदीप कंद यांना ‘जागा दाखवण्यासाठी’ दंड थोपटले, त्यांनीच निवडणुकीत ‘जागा’ जिंकली

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात

PDCC Bank Election | दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या