PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, इतर जागांची मतमोजणी सुरू

PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, इतर जागांची मतमोजणी सुरू
PDCC Bank Election

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी दोन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

अश्विनी सातव डोके

| Edited By: भीमराव गवळी

Jan 04, 2022 | 11:04 AM

पुणे: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी दोन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. अजून चार जागांची मतमोजणी सुरू असून या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी आज अल्पबचत भवन येथे सुरू झाली आहे. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीचा ‘क’ गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील’ अ ‘वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता आहे.

मैत्रीपूर्ण लढतीतही राष्ट्रवादीच विजयी

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. तर त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. तिसरा निकालही राष्ट्रवादीच्या बाजूनेच लागला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.

घुलेंचा पराभव, राष्ट्रवादीला दणका

या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर मात्र राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला आहे. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याच आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.

विजयाचा गुलाल, राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने

दरम्यान, या निवडणुकीचा पहिला निकाल हाती राष्ट्रवादीच्या खात्यात जातात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धावतच रस्त्यावर गुलाल उधळून आनंदाला वाट मोकळी करून दिली. ढोलताशे वाजवत या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पण कोणताही अनर्थ घडला नाही.

अजितदादा सातवेळा अध्यक्ष

अनेक वर्षांपासून या बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची एकहाती सत्ता आहे. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्यात. उरलेल्या सात पैकी हवेली तालुक्यातील एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होती.

शिरुर

अशोक पवार -109
आबासाहेब गव्हाणे- 21

मुळशी

सुनील चांदेरे- 27
आत्माराम कलाटे- 18

हवेली

विकास दांगट- 73
म्हस्के-58

संबंधित बातम्या:

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी, एकहाती सत्तेसाठी अजितदादा उत्सुक

पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार

Pune Corona | पुण्यात 80 टक्के रुग्णांनी दोन्ही डोस घेतले, तरी कोरोनाची लागण; आणखी कठोर निर्बंध लागणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें