AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | कुत्र्याला लाथ मारण्याची कुरापत अंगलट, पिंपरीत चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला

रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला (Pimpri Rickshaw Driver hit Dog)

VIDEO | कुत्र्याला लाथ मारण्याची कुरापत अंगलट, पिंपरीत चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला
कुत्र्याला लाथाडताना रिक्षा चालकाचा अपघात
| Updated on: May 17, 2021 | 11:00 AM
Share

पिंपरी चिंचवड : रस्त्यावर शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला धावत्या रिक्षातून लाथ मारण्याची कुरापत रिक्षा चालकाच्या चांगलीच अंगलट आली. कुत्र्याला लाथाडण्याच्या प्रयत्नात चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला. तर रिक्षा नियंत्रणाबाहेर जात दुभाजक ओलांडून गेली. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pimpri Chinchwad Rickshaw overturns as Driver tried to hit Street Dog CCTV Footage Video Viral)

पादचाऱ्यांनी रिक्षा थांबवली

पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

रिक्षा चालकाला चांगलाच धडा

या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फूटेज शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला मात्र चांगलाच धडा मिळाला.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या 

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

(Pimpri Chinchwad Rickshaw overturns as Driver tried to hit Street Dog CCTV Footage Video Viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.