Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

हलगर्जी आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे असाच एक अपघात झाला आहे. (karnataka bangalore two wheeler road accident )

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
viral road accident
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 5:54 PM

बंगळुरु : रस्त्यावरील अपघातामुळे अनेकांना जीव गेल्याचे आपण रोजच ऐकतो. मात्र, यातील काही घटना या अंगावर काटा उभा करणाऱ्या असतात. सध्या हलगर्जी आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे असाच एक अपघात झाला आहे. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे दृश्य हे थरारक आहे. एका लहानशा चुकीमुळे या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागलाय. अपघाताची ही घटना कर्नाटकमधील बंगळुरु येथे घडली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. (Karnataka Bangalore Two wheeler rider died in road accident video goes viral)

अपघात नेमका कसा झाला ?

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील बंगळुरु येथे हा अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये दिसतं त्याप्रमाणे एका बाजूने एक स्कुटी चालक स्कुटी घेऊन येत आहे. त्याच्या समोरुन एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने येताना दिसतोय. वळणाचा रस्ता असल्यामुळे समोर असलेली स्कुटी दुचाकीवरील व्यक्तीला दिसली नाही. परीणामी स्कुटीवरील व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील व्यक्तीचा गंभीर अपघात झाल्याचं दिसतंय. या अपघातात दुचाकीस्वार समोर असलेल्या काँक्रीटच्या भिंतीला धडकला. यामध्ये दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे या व्यक्तीचा दुचाकीवरील तोल सुटला आणि परिणामी ही व्यक्ती थेट हवेत उडाल्याचे दिसतेय.

स्कुटीवरील व्यक्तीचा पळ

हा अपघात झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या स्कुटीमुळे हा अपघात झाला, तोच व्यक्ती अपघातानंतर पळ काढताना दिसतोय. अपघातानंतर जी व्यक्ती हवेत उडून रस्त्यावर आदळली त्याची मदत स्कुटीवाला व्यक्ती करु शकला असता. मात्र, तसे न करता स्कुटीवाला व्यक्ती निर्दयपणे निघून जाताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीलो पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त दुचाकीस्वारास नंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला साथ न दिल्यामुळे नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या हा व्हिडीओ अनेकांकडून शेअर केला जात असून प्रवास करताना खबरदारीने दुचाकी चालवावी असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Video | डोक्याला बाशिंग, बाजुला नवरी, नवरदेवाने वाजवला असा ताशा की लोक झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल

Video | ‘चायनीज ब्युटी’च्या अदाकारीने भारतीय घायाळ, लाखोंनी चाहते असलेली ‘ही’ तरुणी आहे तरी कोण ?

Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून ‘असं’ केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल

(Karnataka Bangalore Two wheeler rider died in road accident video goes viral)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.