Video | डोक्याला बाशिंग, बाजुला नवरी, नवरदेवाने वाजवला असा ताशा की लोक झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल

सध्या स्वत:च्याच लग्नामध्ये बेधुंद होऊन ताशा वाजवणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (groom played drum viral video)

Video | डोक्याला बाशिंग, बाजुला नवरी, नवरदेवाने वाजवला असा ताशा की लोक झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल
groom viral video

मुंबई : सध्या लग्नसराई सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट असूनदेखील मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींची लग्न होतायत. कोरोनामुळे जास्त लोकांना जमवायची परवानगी नसली तरी लग्न काही थांबलेले नाहीयेत. जमेल तितक्या आणि जमेल त्या जागेवर लोक लग्नसोहळा उरकून घेतायत. यामध्ये सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या स्वत:च्याच लग्नामध्ये बेधुंद होऊन ताशा वाजवणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (groom played drums in his own marriage video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

जेव्हा एखाद्या घरी लग्न असते तेव्हा वाजंत्री मंडळींना विशेष बिदागी दिली जाते. त्यांना पैसै देवून त्यांच्याकडून लग्नसोहळ्यात आनंदी, उत्साहवर्धक गीत वाजवून घेतले जातात. वेगवेगळ्या कर्नमधूर गाण्यांमुळे लग्नसोहळ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होत असते. या काळात नवऱ्या मुलाचा थाट काही वेगळाच असतो. सुटबुट तसेच कोट घालून फिरणारा नवरदेव हा लग्नातलं मुख्य आकर्षण असतो. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काहीसं वेगळंच चित्र आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव हा चक्क वाजंत्र्यांमध्ये मिसळून दिलखुलासपणे ताशा वाजवताना दिसतोय. विशेष म्हणजे या नवरदेवाची ताशा वाजवण्यावर असलेली पकड चांगलीच थक्क करुन सोडणारी आहे. संगीतामधील चढउतार त्याला चांगलेच अवगत आहेत. अगदीच तन्मयतेने हा नवरदेव ताशा वाजवताना दिसतोय.

नवरी प्रभावित, नेटकऱ्यांकडून नवरेदवाला दाद

थेट नवरदेवच ताशा वाजवताना दिसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर अनेकजणांनी नवरदेवाच्या या कलेवर प्रभावित होऊन त्याला चांगलीच दाद दिली आहे. यातीलच एकाने नवरदेव ताशा वाजवत असलेला एक व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या शेजारी नवरीसुद्धा उभी असल्याचं दिसतंय. तिसुद्धा आपल्या नवऱ्याची ही कला पाहून थक्क झाल्याचं दिसतंय. तिसुद्धा आपल्या नवऱ्याचं ताशा वाजवणं आनंदाने पाहतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. त्याला अनेकांनी लाईक करुन मजेदार कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणूजे काही नेटकऱ्यांनी नवरदेवाच्या या ताशा वाजवण्याला अनेकांनी सध्याच्या लॉकडाऊनशी जोडलं आहे. लॉकडाऊन असताना वाजंत्री मंडळींमध्ये एक माणूस वाढेल म्हणून थेट नवरेदवच ताशा वाजवायला उतरला आहे, असे एका नेटकऱ्याने मिश्कीलपणे कमेंट केली आहे. तर आत्मनिर्भर नवरदेव म्हणून एकाने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ‘चायनीज ब्युटी’च्या अदाकारीने भारतीय घायाळ, लाखोंनी चाहते असलेली ‘ही’ तरुणी आहे तरी कोण ?

Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून ‘असं’ केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

(groom played drums in his own marriage video goes viral)