‘वारकरी संगीत परंपरा’ पुस्तक प्रकाशनात संगिताची मेजवाणी

Pune News | पुणे येथील आळंदीत 'वारकरी संगीत परंपरा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संगीताची मेजवणी झाली. यामुळे आळंदीकरणांना दुसऱ्यांदा दिवाळी पहाट कार्यक्रमाची अनुभूती झाली.

वारकरी संगीत परंपरा पुस्तक प्रकाशनात संगिताची मेजवाणी
| Updated on: Nov 20, 2023 | 2:23 PM

पुणे, दि. 20 नोव्हेंबर | पुणे येथील आळंदीत पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या ‘वारकरी संगीत परंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामुळे आळंदीकर मंत्रमुग्ध झाले. दिवाळी पहाटच्या मेजवानीनंतर या कार्यक्रमामुळे तीर्थक्षेत्र आळंदीत रसिकांना पुन्हा एकदा संगीताची मेजवणी मिळाली. ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, पंडित कल्याण गायकवाड, ख्यातनाम कलाकार पं. अभिजित पोहनकर, सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड पिसे, कौस्तुभ गायकवाड आणि पंडित कल्याण गायकवाड यांचे शिष्यवृंद आदींचे शास्त्रीय संगीत श्रवण करण्याची सुवर्ण संधी लाभली. शास्त्रीय संगीताने आळंदीकर मंत्रमुग्ध झाले.

संगीत क्षेत्राला भरारी मिळेल – संभाजीराजे

ज्येष्ठ गायक पंडित अजज पोहनकर, पंडित कल्याण गायकवाड, गायिका कार्तिकी गायकवाड, गायक कौस्तुभ गायकवाड यांचे संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. पिढ्यान पिढ्या संगीत क्षेत्राला त्यांच्यामुळे भरारी मिळेल, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ गायक पंडित अजयजी पोहनकर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पंडित कल्याणजी गायकवाड, उद्योजिका शोभाताई रसिकलाल धारीवाल, माजी सभापती रामदास ठाकूर, भानुदास खोतकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, बबनराव कुन्हाडे, डी. डी, भोसले, अजित वडगावकर, संजय घुंडरे, डॉ. धनंजय जाधव, राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तकाचे प्रकाशन

सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड पिसे आणि कौस्तुभ गायकवाड यांचे सुगम संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपूजन सोहळ्यानंतर वारकरी संगीत परंपरा पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, ज्येष्ठ गायक पंडित अजयजी पोहनकर यांना ‘गुरू महाराव पुरस्कार’, प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांना ‘सामाजिक कार्यगौरव पुरस्कार’ व बाळासाहेब पाटील यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कल्याणराव अपार यांचे शहनाई वादन झाले. सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर व पूजा थिगळे यांनी केले, तर गायिका कार्तिकी गायकवाड यांनी आभार मानले.