AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसत-खेळत ऑपरेशन थिएटरमध्ये गेली, पण…; 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत प्रसिद्ध रुग्णालयात काय घडलं?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ६ वर्षीय चिमुकलीचा मोतीबिंदू ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हसत-खेळत ऑपरेशन थिएटरमध्ये गेली, पण...; 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत प्रसिद्ध रुग्णालयात काय घडलं?
Deenanath Mangeshkar Hospital
| Updated on: May 20, 2026 | 1:51 PM
Share

पुण्यातील एरंडवणे परिसरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा डोळ्याच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी बागडे असे या मृत बालिकेचे नाव आहे. ती मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मोहझरी गावची रहिवासी होती. डॉक्टरांच्या आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच प्रियांशीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मोहझरी येथील रहिवासी असलेल्या प्रियांशीला डोळ्यांचा मोतीबिंदूचा त्रास होता. त्यावर पुण्यातील चांगल्या रुग्णालयात उपचार व्हावेत, यासाठी कुटुंबीयांनी तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक तपासण्यांनंतर तिला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र, ऑपरेशन सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. कोणताही गंभीर किंवा मोठा आजार नसताना, फक्त एका डोळ्याच्या साध्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या मुलीचा असा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

“माझी मुलगी हसत-खेळत गेली होती…” वडिलांचा भावनिक आक्रोश

या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच प्रियांशीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. प्रियांशीच्या वडिलांनी अत्यंत जड अंतःकरणाने आक्रोश व्यक्त केला. माझी मुलगी घरातून हसत-खेळत आली होती. तिला दुसरा कोणताही आजार नव्हता, फक्त डोळ्याचे साधे ऑपरेशन होणार होते. पण डॉक्टरांच्या चुकीमुळे तिचा जीव गेला आहे. जो भयंकर प्रकार माझ्या निष्पाप मुलीसोबत घडला, तसा निष्काळजीपणा दुसऱ्या कुणाच्याही लेकीसोबत घडू नये, हीच प्रार्थना, असे तिचे वडील म्हणाले.

पोलीस चौकशी सुरू 

या धक्कादायक प्रकारानंतर प्रियांशीच्या संतप्त कुटुंबियांनी तात्काळ पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेत रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्रियांशीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण शोधण्यासाठी हे प्रकरण आता मेडिकल बोर्डाकडे (वैद्यकीय समिती) सोपवण्यात आले आहे. मेडिकल बोर्डाचा अंतिम अहवाल आल्यानंतर, जर रुग्णालयाचा हलगर्जीपणा सिद्ध झाला, तर दोषींवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

मोहझरी गावात अंत्यविधी; संपूर्ण परिसर शोकाकुल

दरम्यान, प्रियांशीचे पार्थिव तिच्या मूळ गावी, मोहझरी बालाघाट, मध्य प्रदेश येथे नेण्यात आले. तिथे अत्यंत शोकाकुल आणि जड वातावरणात तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. एका निष्पाप चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे दोषी डॉक्टरांवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा