AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं, वकिलाच्या विवाहित महिला सेक्रेटरची त्याच्या ऑफिसमध्येच हत्या, बायको मुलीने मिळून केला गेम, कारण..

पुण्यात एक खतरनाक घटना घडली आहे. पुण्यात वकिलाच्या ऑफिसमध्ये त्याच्या बायकोनेच विवाहित महिला सेक्रेटरची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पण या हत्येचं कारण काय?.

पुणे हादरलं, वकिलाच्या विवाहित महिला सेक्रेटरची त्याच्या ऑफिसमध्येच हत्या, बायको मुलीने मिळून केला गेम, कारण..
Pune Advocate office killing
| Updated on: Apr 18, 2026 | 4:09 PM
Share

पुण्यात एका वकिलाच्या ऑफिसमध्ये 32 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे. पोलिसांनी वकिलाची पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला या गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे. अफेअरच्या संशयातून ही हत्या करण्यात आली आहे. पुण्याच्या चंदननगर भागात ही घटना घडली. मृत मुलीच्या कुटुंबियांची दिशाभूल करणे आणि गुन्हा लपवण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वकिलाला सुद्धा ताब्यात घेतलं आहे. पूनम दिनेश मून असं मृत महिलेचं नाव असून ती येरवडा येथे रहायला आहे. मागच्या साडेतीन वर्षांपासून ती वकिल संजय सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक आणि सेक्रेटरी म्हणून त्यांच्यासोबत काम करत होती.

16 एप्रिलला पूनम नेहमीप्रमाणे कामावर आली. संजय सावंत यांची पत्नी स्वातीला संशय आला की, पूनम आणि संजय यांचे अनैतिक संबंध आहेत. स्वाती आणि तिच्या अल्पवयीन मुलीने पूनमचे हात-पाय बांधले व तिला बॅटने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत पूनम घरी आली नाही. म्हणून तिचा नवरा दिनेशने वकिल संजय सावंत यांना फोन लावला. पोलिसांननुसार, संजय सावंत यांनी त्यावेळी दिनेश यांची दिशाभूल केली. त्यांनी सांगितलं की, पूनम कदाचित तिच्या मैत्रीणीला भेटायला गेली असेल.

गुन्ह्याची उकल कशी झाली?

सावंत यांच्या जुना मुंढवा रोडला असलेल्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी दिनेश आला. त्यावेळी गुन्ह्याची उकल झाली. कार्यालयाचं शटर उघडं होतं. त्याने आतामध्ये जाऊन पाहिलं, तेव्हा पूनमचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. एका गोणीत मृतदेह भरुन ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं पोलिसांनी सांगितलं.

वकिलावर काय आरोप?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकिल संजय सावंत या मारहाणीत सहभागी नव्हते. ते सहआरोपी आहेत. त्यांच्यावर माहिती दडवण्याचा, आरोपींना मदत करण्याचा आणि मृत महिलेच्या पतीची दिशाभूल करण्याचा आरोप आहे. चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेने सहातासात गुन्ह्याची उकल केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...