AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते घरातून चांगले गेले आणि माशासारखे तडफडून…; पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार, महिला म्हणाल्या पोलीस हफ्ता घेतात अन्…

पुण्यात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून फुगेवाडीतील महिलांनी पोलिसांवर हप्ता घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माणसं माशासारखी तडफडून मेली' असा आक्रोश करत महिलांनी दारू बंदीची मागणी केली आहे.

ते घरातून चांगले गेले आणि माशासारखे तडफडून...; पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार, महिला म्हणाल्या पोलीस हफ्ता घेतात अन्...
Pune alcohol deaths
| Updated on: May 29, 2026 | 12:19 PM
Share

पुण्यातील फुगेवाडी आणि परिसरात विषारी दारूमुळे १४ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कालपर्यंत हसते-खेळते असणारे आपले कुटुंबीय अचानक डोळ्यांसमोरून गेल्यानं आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर आणि आझाद चौक परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रत्यक्षदर्शी महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांना हप्ता मिळतो, ते कारवाई काय करणार?” असा गंभीर आरोप या गावातील महिलांनी केला आहे.

“एकाच दिवशी घरातील चार जण गेले…”

या भीषण दुर्घटनेत आपल्या हक्काची माणसं गमावलेल्या एका महिलेने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, “यात आमच्या घरातल्या चौघांचा मृत्यू झाला. तीन आमच्या घरातले आणि एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे. एकाच दिवशी चार जण गेले. हे केवळ आणि केवळ विषारी दारूमुळेच झालं आहे. ते दारू पिऊन आले आणि उलट्या करायला लागले. डॉक्टरकडे नेईपर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी थेट मृत घोषित केलं, असे ती म्हणाली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिल्यानंतर काही वेळातच बाधितांची प्रकृती वेगाने खालावली. ते घरातून चांगले गेले होते, पण तिथून आल्यावर माशासारखे तडफडायला लागले. ना बोलणं, ना चालणं… काही समजायच्या आत सगळा खेळ खल्लास झाला, अशा शब्दांत महिलांनी रात्रीचा थरार सांगताना हंबरडा फोडला.

“पोलीस हफ्ता घेतात आणि निघून जातात!”

यावेळी काही महिलांनी परिसरातील बेकायदेशीर दारू धंद्यांवर तीव्र असंतोष व्यक्त केला. तर एका वृद्ध महिलेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही म्हातारे झालो, पण या महिन्यात दारूमुळे खूप माणसं मेली. पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. पोलिसांना हफ्ता मिळतो, ते कशाला कारवाई करतील? पैसे घेतात आणि जातात. पोलीस आले की १० मिनिटं दारूचा धंदा बंद होतो आणि ते गेले की पुन्हा सुरू होतो,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

तर दुसऱ्या एका महिलेने लहान मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत सांगितले की, “दारूमुळे अख्खी घरं उद्ध्वस्त व्हायला लागली आहेत. लहान लहान मुलंही दारू प्यायला लागलीत. लेकरं-बाळं रस्त्यावर आली आहेत. ही दारू कायमची बंद झालीच पाहिजे.” तर एका मुलीने आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. “माझे बाबा दारूशिवाय पाण्याचा घोटही पित नव्हते, दारू असल्याशिवाय ते दोन-दोन दिवस जेवतही नव्हते. या दारूने आमचं सगळं संपवलं.” अशी व्यथा वडिलांनी मांडली.

फॉरेन्सिक टीम दाखल; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कुणाचीही गय करू नका, दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. संशयित मुख्य विक्रेता योगेश वानखेडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून, त्याने विक्री केलेले दारूचे कॅन जप्त केले आहेत. दरम्यान, या दारूमध्ये नेमके कोणते रसायन होते, हे शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम दापोडी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, दारूचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा