Big Breaking | पुणे हादरलं, या ठिकाणी सिलेंडरचा मोठा स्फोट, परिसरात भीषण आग

Pune Fire News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून विमान नगर येथे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. एकाच वेळा दहा सिलेंडर फुटल्याने परिसरात मोठी आग लागली आहे. या स्फोटामध्ये तब्बल दहा सिलेंडर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि आगीने काही वेळात रौद्र रूप धारण केलं.

Big Breaking | पुणे हादरलं, या ठिकाणी सिलेंडरचा मोठा स्फोट, परिसरात भीषण आग
Pune Viman Nagar Fire
| Updated on: Dec 27, 2023 | 4:22 PM

अभि पोते, पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी दहा सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पुण्यातील विमान नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता तब्बल 100 सिलेंडरचा बेकादेशीरपणे साठवण्यात आले होते. यामधील 100 पैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आली आहे.

ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू होतं त्या ठिकाणा इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता? असा सवाल उपस्थित होत आहे. १०० सिलेंडरचा साठा कशासाठी? स्फोट होण्याचं कारण काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.