AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाराला कुलूप, अंगणवाडीत मुलांंना कोंडले अन् सेविका सरपंचांसोबत… पुण्यातील धक्कादायक प्रकार, CCTV समोर

पुण्यातील हिंजवडी येथील अंगणवाडीत सेविकांनी 20 लहान मुलांना कुलूप लावून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीला जाण्यासाठी सेविका व मदतनीस मुलांना एकटे सोडून गेल्या.

दाराला कुलूप, अंगणवाडीत मुलांंना कोंडले अन् सेविका सरपंचांसोबत... पुण्यातील धक्कादायक प्रकार, CCTV समोर
pune 1
| Updated on: Nov 27, 2025 | 11:26 AM
Share

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदार कृत्यामुळे सध्या हिंजवडीत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हिंजवडी येथील अंगणवाडीमधील सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल 20 लहान मुलांना कुलूप लावून अंगणवाडीत कोंडून ठेवल्याची बाब समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस या लहान मुलांना कोंडून स्वतः ग्रामपंचायतीच्या एका बैठकीसाठी निघून गेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी २६ नोव्हेंबर दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील माजी सरपंचाने बोलावलेल्या एका बैठकीला जायचे होते. त्यावेळी अंगणवाडीची वेळ सुरु होती. या अंगणवाडीतील मुलांची योग्य व्यवस्था न करता, त्यांनी मुलांना अंगणवाडीच्या खोलीत बंद केले. त्यांना बाहेरून कुलूप लावून त्या निघून गेल्या. साधारण तासभर ही लहान मुलं त्या खोलीत बंद होती. यावेळी भीतीपोटी आणि एकटेपणामुळे ते मोठमोठ्याने रडू लागले.

या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला असून मुलांचा आक्रोश पाहून पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना विचारले असता त्यांनी माजी सरपंचांनी बैठकीला बोलावले म्हणून आम्ही कुलूप लावले,” असा बेजबाबदार खुलासा केला आहे. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना माहिती दिली.

त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकारी गिराम यांनी तात्काळ सेविका आणि मदतनीस यांना बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप खोलण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांनी परत येऊन कुलूप उघडले आणि मुलांना मोकळे केले.

अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह

दरम्यान लहान मुलांना अशा प्रकारे कोंडून ठेवणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक होते. कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या बचावाचा मार्ग नव्हता. हा सरकारी बाल विकास योजनांच्या नियमांचे उल्लंघन करणारा गंभीर प्रकार आहे. सध्या तरी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र या घटनेमुळे अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...