AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना मारहाणीनंतर वातावरण तापलं, DJ विरोधात आज पुणेकर रस्त्यावर, थेट…

Pune DJ Ban Protest Vidyanand Bapat: गणेशोत्सवासह सणासुदीत वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डीजेविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला. त्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर आता संतप्त पुणेकर रस्त्यावर उतरणार आहे. थोड्याच वेळात पुण्यात डीजे बंदीसाठी मोर्चा निघणार आहे. काय आहे अपडेट?

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना मारहाणीनंतर वातावरण तापलं, DJ विरोधात आज पुणेकर रस्त्यावर, थेट...
DJ विरोधात आज पुणेकर रस्त्यावरImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 06, 2026 | 9:15 AM
Share

विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डीजेविरोधात आवाज उठवत आहे. त्यांच्या भूमिकेला जनसामान्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तर काहींनी डीजे समर्थन केले आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असताना टिळक रोड परिसरात बापट यांना संतोष चव्हाण या तरुणाने मारहाण केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी डीजेला विरोध करण्यासाठी आज पुणेकर रस्त्यावर उतरणार आहे. थोड्याच वेळात पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

डीजे आणि स्पीकरच्या आवाजाविरोधात पुण्यात मोर्चा

डीजे आणि स्पीकरच्या आवाजाविरोधात पुणेकर आज रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौक ते पुणे महानगरपालिकेपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौक येथून मोर्चा महापालिकेच्या दिशेने निघणार आहे. डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट देखील मोर्चात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेवर धडकणार मोर्चा

रविवारी सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करणार आहेत. याठिकाणी पुणे महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रविवारी , 6 सप्टेंबर रोजी आयोजित मोर्चाच सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध पुणेकर करणार आहे.

जिवंत असेल तर मोर्चात सहभागी

यापूर्वी माध्यमांशी बोलताना विद्यानंद बापट यांनी नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत जर मी जिवंत असेल तर मोर्चात सहभागी होईल असे म्हटले होते. आपल्यावर सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला करण्यात आल्याचे, मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान आज बापट या मोर्चात सहभागी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणेकरांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आजच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरवर राज्यातील अनेक शहरात बंदी घालण्यात आली आहे. लेझर लाईटवरही बंदी आदेश देण्यात आले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...