मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारात सहकार नगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सहकार नगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकजण जखमी
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल जवळ असलेल्या मेडिकलवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जखमी झाला आहे. या घटनेत तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
योगेश मानेकर हा तरूण जखमी
रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी शिंदे हायस्कूल जवळ असलेल्या मेडिकलवर हा गोळीबार झाला आहे. या घचनची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळावर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी हजर असून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेत योगेश मानेकर नावाचा तरूण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. योगेशला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामागे नेमकं काय कारण होतं हे समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी काय म्हटले?
या घटनेची माहिती देताना पुणे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी याबाबत सांगितले की, बिकानेर चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. दोन राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. 4 जणांनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला हे समजू शकलेले नाही. जखमी तरूणाची प्रकृती सध्या स्थिर आहे. ही घटना टोळीयुद्धातून झालेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पाटसमध्येही गोळीबाराची घटना घडली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तरूणांनी गोळीबार केल्याचे समोर आले होते.