AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. | Rape

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार
हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे.
| Updated on: Feb 15, 2021 | 7:13 AM
Share

पुणे : पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. (pune police Arrested 20 year Old man For Raping Minor Girl in Vimannagar Pune)

विमानतळ पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली असून पीडित चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी करण दिलीपकुमार गोस्वामी (वय.२०, रा.विमाननगर) यास विमानगर पोलिसांनी केली अटक केली आहे.

आरोपी विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो, तर पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडील दोघेही कामाला जातात. आई-वडील कामाला गेल्यानंतर पीडित चिमुरडी घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले.

दुपारी आरोपीने पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावले आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या चिमुरडीवर सध्या पुण्यातील एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(pune police Arrested 20 year Old man For Raping Minor Girl in Vimannagar Pune)

हे ही वाचा :

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

वेश्या, गरीब महिला असे 93 खून, जगाला हादरवून सोडणाऱ्या बॉक्सरची थरकाप उडवणारी कहाणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.