जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

जुन्या प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मुंबईतील परळ परिसरात घडली. (man attacked ex girlfriend mumbai)

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक
GIRL ATTACK
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:52 PM

मुंबई : जुन्या प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मुंबईतील परळ परिसरात घडली. या हल्ल्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे सध्या या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man attacked on his ex girlfriend in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेली महिला आणि आरोपी राजेश काळे हे एकमेकांवर प्रेम करायचे. त्यानंतर काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. याच विषयावर दोघांमध्ये बोलणे सुरु होते. मात्र, या दोघांमधील वाद टोकाला गेला. त्यांनतर रागाच्या भरात आरोपी अशोक काळे याने जवळचा चाकू काढून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्या महिला गंभीर जखमी झाली.

दरम्यान ही घटना समजातच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या महिलेला नागरिकांनी जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार महिलेवर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकारानंतर भोईवाडा पोलिसांनी आरोपी राजेश काळे याला अटक केली असून त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सोलापुरात लग्नास नकार दिल्याने आतेबहिणीचा खून

सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाला आईने नकार दिल्याच्या रागातून तरुणाने 11 फेब्रवारी रोजी आतेबहिणीचा गळा आवळून खून केला. ज्योतिबा अशोक गायकवाड असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. सोलापूर शहर एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुनीता कुसेकर असं मृत आतेबहिणीचं नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी ज्योतिबा गायकवाड याने मृत सुनिता कुसेकरच्या आईकडे जाऊन लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हा सुनिताच्या आईने मुलगी अजून शिक्षण घेत आहे. आताच लग्नाचा विचार नाही, असे सांगत लग्नास नकार दिला होता. याचाच राग मनात धरुन ज्योतिबाने तरुणीचा गळा आवळून खून केला

इतर बातम्या :

इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

(young man attacked on his ex girlfriend in mumbai)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.