इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

ईडीचे अधिकारी आज (गुरुवार) अरमान जैन याची चौकशी करणार आहेत. टॉप्स ग्रुप मनी लाँड्रिंग घोटाळ्यासाठी अरमानची चौकशी होणार आहे. (Arman Jain summoned by ED )

इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 11:30 AM

मुंबई : बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर, करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांचा आत्तेभाऊ अरमान जैन ईडीच्या रडारवर आहे. अरमान जैन याला अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावले आहे. टॉप्स ग्रुप घोटाळ्याबाबत अरमानला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. (Arman Jain summoned by ED in Tops Group Scam)

ईडीचे अधिकारी आज (गुरुवार) अरमान जैन याची चौकशी करणार आहेत. टॉप्स ग्रुप मनी लाँड्रिंग घोटाळ्यासाठी अरमानची चौकशी होणार आहे. यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीही टॉप्स ग्रुप घोटाळ्यात चौकशी झाली आहे.

कोण आहे अरमान जैन?

अरमान जैन हा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राज कपूर यांचा नातू आहे. अरमानच्या पेडर रोडवरील घरी मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. अरमान पत्नी अनिशा मल्होत्रा जैन, आई रिमा कपूर जैन यांच्यासह राहतो.

त्याच वेळी राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त

ईडीने धाड टाकली असतानाच अरमानचे मामा राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले. त्यानंतर रिमा जैन यांना घराबाहेर पडण्याची परवानगी ईडीने दिली. अरमानच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन तास झाडाझडती घेतली. त्यानंतर अरमान जैनलाही मामाच्या अंत्यविधींना जाण्याची परवानगी देण्यात आली.

‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेले अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे मंगळवारी (9 फेब्रुवारी) निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 58 वर्षीय राजीव यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीव कपूर यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूरही रुग्णालयात आले होते. प्रयत्न करूनही डॉक्टर राजीव यांचा जीव वाचवू शकले नसल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं. (Arman Jain summoned by ED in Tops Group Scam)

टॉप्स ग्रुप घोटाळा काय आहे?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याचा आरोप केला जात आहे. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्याबाबतचा तपास करत आहेत.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती.

संबंधित बातम्या :

राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच?

(Arman Jain summoned by ED in Tops Group Scam)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.