AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. रविवारी मध्यरात्री तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली (Parali Student Pooja Chavan Suicide )

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक
| Updated on: Feb 11, 2021 | 9:00 AM
Share

पुणे : चार दिवसांपूर्वी (7 फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पुजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे. (Parali Student Pooja Chavan Suicide in Pune Vidharbha Minister on radar)

नेमकी घटना काय?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

भाजपकडून आता रितसर तक्रार पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे.

ऑडिओ क्लिपमधून उलगडा होणार?

पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पुजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होती आहे.

संबंधित बातम्या :

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

(Parali Student Pooja Chavan Suicide in Pune Vidharbha Minister on radar)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.