AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांनो सावध राहा, मसाजच्या नावाखाली सुरु होता काळाधंदा, मोठं रॅकेट पकडलं

पुणे पोलिसांनी आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या आडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. स्वारगेट परिसरातील दोन सेंटरवर छापे टाकून पाच महिलांची सुटका करण्यात आली.

पुणेकरांनो सावध राहा, मसाजच्या नावाखाली सुरु होता काळाधंदा, मोठं रॅकेट पकडलं
pune 1
| Updated on: Sep 25, 2025 | 11:57 AM
Share

पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने स्वारगेट परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून साधारण 5 पीडित महिलांची सुटका केली. तर या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

दोन ठिकाणी छापेमारी

पुण्यातील गुलटेकडी परिसरातील मुकुंदनगर आणि मार्केटयार्ड भागात हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत, मार्केटयार्ड भागातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे चार महिला काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या चारही महिलांची सुटका केली. यात छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक करण्यात आली.

तर दुसऱ्या कारवाईमध्ये, मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक सेंटर या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक तोतया ग्राहक पाठवला. त्यानंतर, पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी सेंटरची मालक आणि व्यवस्थापक कविता आनंद शिंदे हिच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच तिला अटक करण्यात आली.

तपास सुरु

दरम्यान पोलीस आयुक्त आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटर, स्पा किंवा आयुर्वेदिक केंद्रांच्या नावाखाली असे बेकायदेशीर धंदे चालवले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना येत आहेत. आरोग्यसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना या घटनांची त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. जेणेकरून अशा गैरकृत्यांवर वेळीच आळा घालता येईल. ही कारवाई एकट्या पुण्याची नसून, शहराच्या विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या केंद्रांवर पोलिसांची करडी नजर आहे. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...