AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अंगावर शहारे आणणारा अघोरी प्रकार! भूत आणि करणीच्या नावाखाली थेट… धक्कादायक घटनेने सुसंस्कृत शहरात खळबळ

सध्या राज्यात अनेक ठिकाणी भोंदूबाबांवर मोठी अॅक्शन घेण्यात आली आहे. पुण्यातून देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोन भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात अंगावर शहारे आणणारा अघोरी प्रकार! भूत आणि करणीच्या नावाखाली थेट... धक्कादायक घटनेने सुसंस्कृत शहरात खळबळ
अघोरी प्रकारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 16, 2026 | 4:21 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच अघोरी कृत्य करत असलेल्या भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण समोर येताच राज्यात खळबळ माजली. त्यानंतर ठिकठिकाणी भोंदूबाबांविरोधात अॅक्शन घेण्यात आली. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘जागरण’च्या निमित्ताने घरात ‘चेडा’ (भूत) आणला आहे, तो कुटुंबाचा भाग बनवायचा आहे अशा भयानक आणि प्रक्षोभक विधानांनी एका कुटुंबाला मानसिक त्रास देणाऱ्या दोन भोंदू भगतांचा कट उघडकीस आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील मंदोशी आणि राजपूर येथे घडली असून, तिने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

किसन तळपे आणि मंगेश कारोटे या दोन कथित भगतांवर पुराव्यासह पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि उपलब्ध पुराव्यांनुसार, या दोघांनी संगनमताने एका कुटुंबात फूट पाडण्याचा आणि त्यांना मानसिक गुलाम बनवण्याचा अघोरी प्रयत्न केला.

धक्कादायक दावे आणि भीतीदायक विधाने

तक्रारीनुसार, जागरणासाठी बोलावणी करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर थडगे असल्याचे सांगून भगतांनी भीती घातली. त्यांनी दावा केला की, “घरात बाहेरचा ‘चेडा’ आणून ठेवला आहे. त्याला कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी विशेष विधी करावे लागतील.” जागरणाच्या बहाण्याने त्यांनी संपूर्ण भावकी (कुटुंबीय) कडून तांदूळ गोळा केले आणि त्याचा नैवेद्य दाखवून आणलेल्या भुताला प्रसन्न करण्याचा नाटक केले. याशिवाय त्यांनी “एकाची पोळी भाजली जाईल, तर बाकीच्यांची करपून जाईल” असे भयावह वाक्य उच्चारले.

तसेच, “पोरांना पुढे केले आणि चोरांना मागे ठेवले” अशा अपमानजनक शब्दांत कुटुंबातील सदस्यांचा अपमानही केला. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबाची मोठी बदनामी झाली.

दोघांचे संगनमत

किसन तळपे (मंदोशी) आणि मंगेश कारोटे (राजपूर) या दोघांनी एकमेकांकडे बोट दाखवत आणि ‘उजवा-डावा प्रसाद’, ‘तांबड्या अंगाऱ्याचे’ नाटक करून दैवी शक्तीचा खोटा देखावा निर्माण केला. यामुळे पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला.

कायदेशीर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड मानसिक तणाव आणि दहशतीखाली आहे. त्यांनी प्रशासनाकडे, महाराष्ट्र अनिष्ट प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१७ अंतर्गत कारवाई करावी, सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी सायबर गुन्ह्यांतर्गत तपास करावा आणि या दोघांना कोणी भाग पाडले किंवा त्यांचा ‘बोलावता धनी’ कोण आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

परिसरात खळबळ

ही घटना उघडकीस आल्यानंतर खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भोंदू भगतांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना सांगण्यात आले आहे की, भूत, करणी, थडगे किंवा अघोरी विधींच्या नावाखाली पैसे किंवा विश्वास घेणाऱ्या व्यक्तींना लगेच पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे तक्रार करावी.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...