AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बास्केटबॉल खेळायला गेला अन् शेवटच्या क्षणी… उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यासोबत पुण्यात काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील मावळ येथे बास्केटबॉलचा लोखंडी खांब डोक्यावर पडल्याने विशाल वर्मा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटमधील या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बास्केटबॉल खेळायला गेला अन् शेवटच्या क्षणी... उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यासोबत पुण्यात काय घडलं?
pune student death
| Updated on: Apr 07, 2026 | 8:25 AM
Share

महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील इंदोरी येथील नामांकित तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये बास्केटबॉल खेळत असताना अंगावर जड लोखंडी स्टँड पडल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. विशाल वर्मा (२०) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बी.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी होता. तो संस्थेच्या वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत होता. रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास तो बास्केटबॉल मैदानात खेळण्यासाठी गेला. यावेळी बास्केटबॉल पोस्टची जड रिंग अचानक निकामी होऊन थेट विशालच्या डोक्यावर कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की विशाल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट

पण या घटनेबाबत दोन वेगवेगळे दावे समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बास्केटबॉलचा खेळ सुरू असताना स्टँड कोसळला. तर महाविद्यालय प्रशासनच्या दाव्यानुसार, विशाल रिंगला लटकून व्यायाम करत होता. त्यावेळी खांब त्याचा भार पेलू शकला नाही आणि ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर तोलानी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर

विशालला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महागड्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे आणि क्रीडा साहित्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच विशालचे आई-वडील अयोध्येहून पुण्यात दाखल झाले आहेत. पोटच्या मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कठोर कायदेशीर कारवाई करणार

यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत कोणाचाही हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिले आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?