AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat : डीजेविरोधात बोलताना विद्यानंद बापटला हाणलं, Tv9 मराठीशी बोलताना घडली घटना

Vidyanand Bapat : पुण्यातील टिळक रोड परिसरात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली आहे.

Vidyanand Bapat : डीजेविरोधात बोलताना विद्यानंद बापटला हाणलं, Tv9 मराठीशी बोलताना घडली घटना
Vidyanand BapatImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 1:50 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. यावादात पुण्यातील विद्यानंद बापट यांनी लक्ष वेधले होते. त्यांनी डीजेचा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे असे म्हणत विरोध केला होता. त्यानंतर विद्यानंद बापट हे चर्चेत आले. आज याबाबत टीव्ही ९ मराठी संवाद साधत असताना विद्यानंद बापट यांना मराहाण करण्याच आली. पुण्यातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट हे टीव्ही ९ मराठीशी बोलत गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी घडलेल्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली.

घडलेल्या घटनेविषयी बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, एक वेडा अचानक आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. तुम्ही पाहात होतात. त्याने का केला कारण मी सशस्त्र नव्हतो हे पाहून त्यांनी हल्ला केला. किंवा आजूबाजूला पोलीस नव्हते हे पाहून त्याने हल्ला केला. जर पोलीस असते तर ते सशस्त्र. टेकनिकली पोलीस इथे आहेत पण त्यांच्याकडे रिव्हॉलवरच नाहीये. हे बघून ते करतायेत. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्. त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती. सवंग प्रसिद्धीसाठी. तुम्ही पाहिलच आहे. तुम्ही साक्षीदार होतात. तुम्हाला तर माहितीच आहे.

पोलिसात करणार तक्रार?

पुढे विद्यानंद बापट यांना पोलिसात या प्रकरणी पोलिसात तक्रार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी “हो मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर ते आले आहेत.”

यावर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्याने काहींची मजल थेट मारहाणीपर्यंत पोहोचली.. पुण्यात भाजपची दादागिरी कशी वाढली, हे याचं उदाहरण….” विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट