Raghunath Kuchik Case Pune: तर शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करीन, रघुनाथ कुचिक यांनी दबाव टाकत धमकी दिल्याचा पीडीत तरुणीचा आरोप

| Updated on: Apr 20, 2022 | 5:02 PM

बंदुकीचा धाक दाखवताना आमच्याकड बंदुकीचा परवाना आहे. तू आमचं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टीकरत असताना कुचिक यांच्या मुलीनेही यामध्ये सहभाग घेतला आहेत.

Raghunath Kuchik Case Pune: तर शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करीन, रघुनाथ कुचिक यांनी दबाव टाकत धमकी दिल्याचा पीडीत तरुणीचा आरोप
Raghunath Kuchik case
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी शिवसेना नेता रघुनाथ कुचिक (Ragunath Kuchik ) यांच्याकडून पीडित तरुणीवर दबाब आणला जातोय. गुन्हामागे न घेतल्यास शरीर संबंधांचे, फोटो , व्हिडीओ व्हायलर (Video viral) करण्याची धमकी दिली आहे.  बंदुकीचा धाक दाखवर समजुतीच्या करारावर सह्या घेतल्या असल्याचे पीडित तरुणीनं म्हटलं आहे. तर कुचिक यांना मदत करणारे सतीश दादर, अमोल गोयल, प्रवीण साळवी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली आहे. याबरोबरच या माहितीचा मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकारे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पाठवला असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. पोलीस (Police)स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस मोरे यांना मी लवकरच ही माहिती देणार असल्याचेही पीडित तरुणीने म्हटले आहे.

बंदुकीचा धाक दाखवत घेतल्या सह्या

कुचिक यांनी रोहित भिसे या मित्रासोबतही हे व्हिडिओ शेअर केले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून कुचिक यांचे मित्र ऍड अतुल शिंदे यांनी माझ्याकडून करारनामा करून घेतला. एवढंच नव्हे तर बंदुकीचा धाक दाखवताना आमच्याकड बंदुकीचा परवाना आहे. तू आमचं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टीकरत असताना कुचिक यांच्या मुलीनेही यामध्ये सहभाग घेतला आहेत. याबाबतचा ईमेल मुख्यमंत्र्यांनाही केला आहे. यामध्ये रघुनाथ कुचिक यांना देण्यात आलेली पदे काढून घ्यावी अशी मागणी पीडितेने केली आहे. मला यापुढे काही झालं तर या सर्वस्वी रघुनाथ कुचिक हेच जबाबदार असतील असे पीडित तरुणीने म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप

मागील आठवड्यात या पीडित तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये तिने चित्रा वाघ यांनीच आपल्या गोव्यात तसंच मुंबईत डांबून ठेवला होते. याबरोबरच विशिष्ट प्रकारचा जाबाब देण्यास चित्रा वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप तिने चित्रा वाघ यांच्यवर केला होता. यानंतर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती.

काय केले होते आरोप

चित्रा वाघ यांना माझं काही पडलेलं नव्हतं. त्याच्या सगळं रोख रघुनाथ कुचिक यांच्यावर होता. चित्रा वाघसह या सगळ्यांनीच माझ्यावर दबाव आणला. जोपर्यंत मी रघुनाथ कुचिक यांच्यासोबत होते, माझी सगळी अबॉर्शन प्रोसेस सुरु होती, तोपर्यंत सगळं ठीक होतं. कारण मी त्यांना विरोध करुन आले होते. त्यानंतर मी प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात नव्हते. पण मला वारंवार फोन करुन परत यायला सांगत होते. इतकंच नाही तर मला गोव्याला घेऊन गेले ते व्यक्ती चित्रा वाघ यांच्या जवळचे होते. चित्रा वाघ यांनी पहिली पत्रकार परिषद मुंबईत घेतली तेव्हा त्याच लोकांनी मला मुंबईतील लिलावती रुग्णालयातजवळच्या हॉटेलमध्ये बळजबरी ठेवलं होतं. माझे मोबाईल काढून घेतले होते. मला तेव्हा थेट पत्रकार परिषदेत समोर आलं. मला तेव्हाही काही बोलायचं नव्हतं. पण तरीही चित्राताई यांनी मला फोर्सफुली बोलायला लावलं.

IPL 2022: Delhi Capitals च्या आणखी एका खेळाडूला Covid-19 ची बाधा, आजचा सामना होणार की नाही? सर्व खेळाडू खोलीत बंद

Pune Firebrigade : आग विझवण्यासाठी जाताना पुण्याच्या हडपसरमध्ये अग्निशामक दलाची गाडी पलटी; एक जवान जखमी

Tata पाठोपाठ Kia देखील खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली किफायतशीर इलेक्ट्रिक कार लाँच करणार