AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेही उतरले ग्रामपंचायतीच्या मैदानात; राज यांच्या एन्ट्रीने कुणाची होणार पंचाईत?

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (raj thackeray in pune held meeting with party workers on gram panchayat election)

राज ठाकरेही उतरले ग्रामपंचायतीच्या मैदानात; राज यांच्या एन्ट्रीने कुणाची होणार पंचाईत?
राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Dec 21, 2020 | 11:07 AM
Share

पुणे: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राज आज पुण्यात आले असून पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुरू केली आहे. राज यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत एन्ट्री केल्यामुळे कुणाची पंचायत होणार? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. (raj thackeray in pune held meeting with party workers on gram panchayat election)

राज ठाकरे आज सकाळीच पुण्यात आले. मनसेने ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून, या पार्श्वभूमीवर राज यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघात मनसेचा किती प्रभाव आहे? त्याभागातील मनसेचं संघटन कसं आहे? कोणते कार्यकर्ते काम करतात? पुण्यातील किती ग्रामपंचायतीसाठी उमदेवार उभे केले जाऊ शकतात? त्यांची परिस्थिती काय आहे? इतर पक्षातील कोणी पदाधिकारी मनसेत येणार आहेत का? आदी सर्व गोष्टींचा आढावा या पदाधिकाऱ्यांकडून राज घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

23 तारखेनंतर मेळावा

यावेळी राज यांनी 23 तारखेनंतर पुणे जिल्ह्यात मेळावा घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यासाठी मैदान बुक करून कामाला लागण्याचे आदेशही राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज यांच्या मुळे कुणाला फटका?

राज ठाकरे यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत एन्ट्री केल्याने त्याचा कुणाला फटका बसेल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसेमुळे शिवसेनेला फारसा फटका बसणार नसल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या काळात मनसेमुळे शिवसेनेला फटका बसला. पण आता ही गळती रोखण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेची व्होटबँक मजबूत असून त्याचा फटका शिवसेनेला बसणार नाही. उलट जो नव मतदार भाजपकडे येऊ शकतो, तोच मतदार मनसेकडे जाण्याची शक्यता असल्याने मनसेचा अप्रत्यक्ष फटका भाजपलाच बसणार असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (raj thackeray in pune held meeting with party workers on gram panchayat election)

संबंधित बातम्या:

LIVE : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसे मैदानात, राज ठाकरे पुण्यात घेणार सभा

बाळासाहेब सानप यांचा सोमवारी भाजपमध्ये प्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का!

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’, ग्रामपंचायतसाठी कंबर कसली, दोन दिवस पुण्यात तळ

(raj thackeray in pune held meeting with party workers on gram panchayat election)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...